Thursday, 20 June 2013

Inline image 2
प्रति
म . 


विषय : झी टी . व्ही . वर प्रसारित होऊ घातलेल्या "जोधा अकबर" या मालिकेवर बंदी घालणे बाबत …….
महोदय ;
आम्ही समस्त राजपूत समाजाच्या वतीने आपणास निवेदन देतो कि ; झी टी . व्ही . वर एकता कपूर यांच्या बालाजी टेलिफिल्म्स मार्फत "जोधा अकबर" या मालिकेचे प्रसारण येत्या काही दिवसात होणार आहे . संबंधित मालिका हि आधारहीन व काल्पनिक विषयावर आधारित असून प्रमाणित इतिहासाचा कोणताही आधार नाही. त्यामुळे संपूर्ण देशातील राजपूत समुदायात संतापाची लाट पसरलेली आहे . देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर राजपूत समाजाचा प्रस्तुत काल्पनिक कथेच्या माध्यमाने अपमान करण्याच्या या प्रयत्ना विरोधात विविध राजपूत संघटनांच्या प्रतिनिधींच्या केंद्रीय शिष्ट मंडळाने दि . ५ जून २ ० १ ३ रोजी नोयडा (दिल्ली) येथील IBF आणि झी टी . व्ही .च्या प्रतिनिधीना निवेदन दिलेले आहे . संबंधित अधिकारी वर्गाकडून योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन मिळालेले असून सुद्धा प्रस्तुत वाहिनी वर संबंधित वादग्रस्त मालिकेची जाहिरात सुरु आहे .
ऐतिहासिक तथ्यांमध्ये बाष्फळ कल्पनांच्या आधारे हवा तो फेरफार करून लोकांपुढे खोटा इतिहास मांडण्याचा तसेच देशासाठी तळहातावर शीर घेऊन ----सर्वस्वाचा होम करून ----प्राणांची आहुती देणाऱ्या देशभक्त क्षत्रिय समुदायाला अपमानित करण्याचा हा डाव आहे . या बाबीस राजपूत समाजाचा तीव्र आक्षेप असून तो आम्ही या निवेदन द्वारे नोंदवीत आहोत .
यापूर्वी श्री आशुतोष गोवारीकर यांनीही या वादग्रस्त व संवेदनशील विषयावर चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी संपूर्ण देशात उसळलेल्या उद्रेकामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून अनेक राज्य सरकारांनी सदरहू चित्रपटाच्या प्रदर्शनास बंदी घातली होती . सध्या एकता कपूर विशाल अश्या समुदायाला डीवचण्याचे धाडस करीत आहेत. केवळ सवंग प्रसिद्धी मिळवून समाजात खळबळ माजविण्यासाठी असे प्रयत्न होत असून आम्ही त्यास एका प्रकारचे सांस्कृतिक आक्रमण असा करार देत आहोत .
आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करतो ; परंतु अभिव्यक्ती व कलेच्या नावाने इतिहासातील लुडबुड कोणत्याही प्रकारे सहन केली जाणार नाही. 
जोधा अकबर विवादाविषयी काही तथ्ये :
1. बादशहा अकबराच्या एकाही बेगम चे नाव जोधा नव्हते. तसा कोणत्याही तत्सम समकालीन ऐतिहासिक संदर्भात उल्लेख नाही. 
2 . हरकाबाई नावाची एक दासी -पुत्री होती जिच्याशी अकबराचा विवाह झाला होता व एक धर्म पिता म्हणून राजा भारमल यांनी तिचे कन्यादान केले होते. हरकाबाई हि राजकुमारी नव्हती. इराण मधील "MALIK NATIONAL MUSIUM AND LIBRARY" द्वारा प्रकाशित ग्रंथांमध्ये हि मुघल बादशहाचा एका दासीशी निकाह झाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. "अकबर-ए-महुरियत " या ग्रंथात स्पष्टपणे लिहिलेले आहे कि; " आम्हास या विवाहाविषयी शंका असून राज परिवाराच्या कोणत्याही सदस्याच्या डोळ्यात अश्रू किंवा मुखावर खिन्नता दिसत नव्हती. तसेच हिंदू रिती नुसार ओटी भरण्याची परंपरा पाळण्यात आलेली नव्हती. 
3. राजपूत इतिहासानुसार राजपूत महिलांनी चिता पेटवून जौहार करणे वेळोवेळी पसंत केलेले होते--- तत्कालीन कर्मठ परंपरानुसार ते केवळ अशक्य अशी गोष्ट होती . म्हणून एका आक्रमक शासकाशी असा विवाह तसेच प्रेमकथा निर्माण होणे हे अविश्वसनीय व अस्वीकारणीय वाटते.
4 . 'बादशाह अकबर यांचे दरबारी असलेल्या समकालीन लेखकांनी लिहिलेल्या ज्या ग्रंथाना तत्कालीन इतिहासाचे व ऐतिहासिक घटनांचे अधिकृत प्रमाण मानले जाते त्या ऐतिहासिक ग्रंथांमध्ये जोधा किंवा जोधा -अकबर या कथेचा कोठे हि उल्लेख नाही . 
ते ग्रंथ पुढीलप्रमाणे :
अ . अकबरनामा -----लेखक : अबुल फझल 
ब . मुंथखाब-ए-तवारीख -----लेखक: अब्दुल कादिर बदायुनी 
क . तबखात-ए-अकबरी ------लेखक : निजामुद्दीन अहमद 
5 . अकबराचा उत्तराधिकारी पुत्र जहांगीर ने लिहिलेल्या " तुजूक- ए-जहांगिरी" या ग्रंथात हि तसा प्रमाणित उल्लेख नाही.
6 . जामिया मिल्लिया इस्लामिया , नवी दिल्ली येथील इतिहास विभागाचे प्रा . डॉ . स . म . अजीजुद्दीन हुसैन यांच्या मते तत्कालीन कोणत्याही हिंदू अथवा मुस्लिम ग्रंथांमध्ये ; वंशावली मध्ये किंवा अन्य ऐतिहासिक दस्तावेजात उल्लेख नाही . 
7 . मुघल घराण्याचे वारस असलेले व वर्तमान हैदराबाद येथे वास्तव्यास असलेले प्रिन्स याकुब तुसी यांनीही या कथे विरोधात तीव्र नापसंती व्यक्त केली असून हि संपूर्ण कथा बनावट असल्याची प्रतिक्रिया वृत्तपत्रांना दिलेली आहे . 
8 . राजपूत संस्थानिका मध्ये आमेर येथील कछवाह शासक हे प्रबळ होते तसेच त्यांची राजकीय युती होती म्हणून बादशाह अकबर असे धाडस करणे शक्य नव्हते. त्या काळात मेवाड च्या रूपाने प्रबळ असे आव्हान मुघल सत्तेपुढे उभे असताना आमेर नरेशांना दुखावण्याचे कोणतेही कृत्य मुघल शासकाकडून होणे युक्तिसंगत वाटत नाही. सध्या झी वर दाखविल्या जाणार्या प्रोमो मध्ये " ये राजपूत अपना सर कटाने से नही डरते है ; मुझे इनका सर झुकाना है ; किला आपका --पुरी रियासत आपकी -----पर इसकी किमत क्या है ---जोधा " अशा प्रकारचा आक्षेपार्ह संवाद दाखवून समस्त राजपूत समाजाला अपमानित करून आव्हान देण्याचा अत्यंत गंभीर प्रकार या मालिके द्वारे होत आहे.
9 . पंडित जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील मध्यकालीन इतिहासाचे प्राध्यापक श्री नजफ़ हैदर यांनी दावा केलेला आहे : " १ ७ व्या शतकातील कोणत्याही अधिकृत मान्यताप्राप्त लिखित कागदपत्रात वा अन्य ग्रंथात जोधा अकबर या तथाकथित कथेचा उल्लेख नाही. "
1 0 . नटनागर शोध संस्थान , सीतामऊ ; लेखक श्री अंजनी कुमार झा ; पत्रकार तथा ब्लोग लेखक श्री रतनसिंह शेखावत तसेच देशातील अनेक अभ्यासक तथा संशोधकांनी या कथेस तीव्र आक्षेप घेतलेला आहे.
1 1 . राजपूत परंपरेनुसार कछवाहा राजघराण्याच्या भाट मंडळी कडील वंशावळीत जोधा नामक कन्येचा उल्लेख नाही.
1 2 . शीख धर्मगुरू अर्जुनदेव आणि हरगोविंद जी यांनीही तत्कालीन राजपूत शासकांच्या चातुर्याचा गौरव पूर्ण उल्लेख केलेला आहे.
एकंदरीत संबंधित मालिका हि केवळ काल्पनिक कथानकावर आधारित असून त्याद्वारे समाजाला चुकीचा संदेश देण्याचा --- ---खोटा इतिहास प्रस्तुत करून भ्रमित करण्याचा-----व देशासाठी बलिदानाची--त्यागाची --शौर्याची पराकाष्ठा करणाऱ्या समाजास बदनाम करण्याचा प्रयत्न संबंधित निर्मातीने चालविलेला आहे. संबंधित विषय हा वादग्रस्त व संवेदनशील असून समाजाच्या संयमाचा उद्रेक करणारा आहे म्हणून शासनाने वेळीच योग्य ती पावले उचलून जोधा अकबर ह्या मालिकेचे प्रसारण थांबवावे व करोडो राजपूत समाज बांधवांच्या भावनांचा सन्मान राखावा . हि विनंती. 
                                                                                           
                                                                                   आपले विनीत 

Thursday, 7 February 2013

"विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत घडविणे हि आपली जबाबदारी....!"