"साथ कोनले देवानी ? धरमनी का आद्रमी नि ?" -- लेखक : श्री जयपालसिंह गिरासे ,(वाठोडा) ह.मु. शिरपूर

उंडायाना दिन---सुनसान रस्ता----सरपंच साहेब नि आपला पोरग्या सना बाबाना इच्छाखातर गाव मा व्हाय-फाय चालू करी देयेल शे त्यामा वैतागवाडीना लोकेसले सध्या ''काम फद्यानं नयी नि रिकामपण घडीभर नं नयी !" अशी गत व्हई जायेल शे भोस्वन. मारुतीना पारवर कारभारी ,तुम्बालाल अप्पा, गोटन जीभो, जादू न्हांजी बठेल व्हतात. वरण-चिखल्या दाबिसन चेपेल व्हत्यात म्हनिसन तुम्बालाल अप्पानि ठायका एक कोपरामा तन्णाई देयेल व्हतं .
कारभारी फेसबुक आणि वात्रेल अप्स वर चांगलाच फैली जायेल व्हतात ....हफ्ताभर पाईन रात दिन फेसबुक आणि वात्रेल अप्स वरना म्यासेजसनी त्यासले गुंगायी टाकेल व्हतं . दिनभर मोबाईल नं रवण रई रायन्तात. 
''जादू भो, औ म्यासेज काय पटना नयी बरं आपुन ले !" --कारभारी बोल्नात .
''काय लिखेल शे कारभारी ? जराखं वाचीसन दखाडा नं ! मना चस्मा घर राही गया आज !"
तोंडमानी गुयनी फेकत तुम्बालाल अप्पा बी जागे व्हयी ग्या..! 
बठास्नी कान टवकारावर कारभारी वाचाले लागनात. ''दखा मंडई , या म्यासेज मा आऊ जुवान म्हणस--'' जर बीभिषण गद्दारी नयी करता ते रावण लंका नयी हरता , तो म्हणस घरमा भेदी व्हता म्हणून रावण युद्ध हरणा आणि मरणा व्हता.''
''त्यान बय, आयी उजी वाचले भेटी रायन!," गोटन जीभो बोलनात.
''या हुस्न्या बाटोड काय काय लिखतीन यांना नेम नयी , रीत नि दुनिया नयी रायनी मंडई! खोटं शे का ? खोटं व्हयी ते परत !", तुम्बालाल अप्पांनी बी मजारमा आपली पिंगानी वाजाळी. 
वैतागवाडी नि ग्रामसभाले आयी बात अज्याबात आवडनि नई. 
शेवट कारभारी बोलनात --" मंडई , बिभीषण आऊ जुवान खानदानी व्हता . त्यांनी धरम नि साथ दिनी. रावण आऊ जरी सग्गा भाऊ व्हता ,तरी त्याले बिभीषण नि गण समजाळ व्हतं. या उपाद्या करू नको रे , आखिर मा पसताशी अशी सांगेल व्हतं त्यानी. सग्गा भाऊ जरी व्हता तरी त्यानं लखन चांगलं नयी व्हतं . रावण आऊ एक नंबरना आद्रमी व्हता आद्रमी ! मंग या आद्रमी नि साथ देवानी का धरम नि साथ देवानी ? सांगा मंडई आते तुमेनच न्याव करा !"
बठी मंडई हाथ वरें करीसन बोलणी --''बिभीषण आऊ खानदानी व्हता , त्यानी जे करेले व्हतं ते नेम्मान करेल व्हतं. रावण आऊ पाप्पी धोत्रा आणि एक नंबरना आद्रमी व्हता .म्हनिसन बिभीषण ले गद्दार म्हणानं आणि त्याले घरना भेदी म्हनिसन त्यांनी बदनामी करांनी आयी बात चांगली नयी , कारभारी ठराव करा , सरकार ले पत्तर लिखा नि आऊ येडा-चाया थांबाळा म्हणा आते.."
''''दखा कारभारी , या उलटी फिटिंगना आणि बिन भेजाना गडबड्या गळू काय लिखतीन नि काय पसारतीन यांना नेम नयी , आयी बठ हायबिरीड नं बिवारं शे , हायबिरीड ना जमानामा बाजरीना तोटाले बी जुवारना कणसे लागतस म्हणे ,अशा आमना यायीना सालाना फुई-सासराना जवाईना डिकरा सांगी रायांता . '', तुम्बालाल अप्पांनी आपली मयमय मोकी करी. 
''पण मंडई , या चगेल भान्या काय बी लिखतीन नि अशाच देव-धरम नि इतिहास वर टीका करतीन ती आपुन अशीच सैन करांनी का ? मी मावालं रोकडा मत त्या ''खोडगाव'' वालास्ना ''उब्गेल गुरुप'' मा लिखं ते त्या अड्मीन नि आम्ले लगेच गुरुप माईन बायेर काळी टांकं हो ! काय नकटपण लागनं त्या बाटोडले काय माईत !"कारभारी नि आपली मन मानी बात सांगी. 
कारभारी नि त्या खोडगाव वाला ''उबगेल गुरुप'' वालास्ना चांगलाच पाटा पाडेल व्हता. त्या गुरुप माना दोन च्यार रीकामचोट रावण नि बाजू वढी रायन्तात . कारभारी त्यासले रावण ना डिकरा म्हनिसन मोक्या व्हयी गया, त्यास्न्या सगाया आते लंका मा कराना बी सल्ला दि टाका , आणि आपली खेड मा कोणता येडा तुमले पोर देस त्याले बी दखी लीसू , तुमले कुवारा खपाडी दिसू अशा धमक्या बी दि टाक्यात. कारभारी नि धमकीमा त्या फारमना कोंबडा दसात्रे पडी गयात नि त्यास्नी सयन-- सये आपला ''उबगेल गुरुप'' ले गळप करी टाका. 
''नॉट इज धिस ! तथायीन सुक्राम भाव्सायेब ना आवाज उना . त्यास्ना शिरपूर वाला धाकला पोर्यानी साम्सुंग ना मोबाईल दि टाकेल व्हता . सुक्राम भाव्साहेब बी ट्वेंटी ट्वेंटी नि गोट ले राम राम करिसन सध्या फेसबुक नि व्हात्स अप वर चांगलाच रमी जायेल व्हतात . सुक्राम भावसाहेब ले बी त्या ''उबगेल गुरुप'' वालास्नी पोस्ट अज्याबात पटनी नयी . संताप मा भावसाहेब नि पायरीवर टेकं. आपली स्टाईल मा बिळी चेटाडत बोलनात ," अं---आयी चांगलं नयी बरं...! म्हणजे काय बी लिखतीन का ? डोकं शे का यासले ? अकला शेतीस का ? धरम नि साथ देनाराले बी गद्दार म्हणाले लागी गयात ! त्यास्नी दिना आद्रमी मारू यास्नी आद्रमिस्नी ! ," सुक्राम भावसाहेब नि बी आपली मयमय काळी टाकी.''त्यास्ना भेजा मा फाल्ट व्हयी त्यामा अशा उचकेल ना गत काय बी लिखी रहातस या .....हुस्न्या यास्नी हुस्न्यास्नी ! फुका त्यासनं दर्सन , बठी गम आयी हागणखळी माती जायेल शे , कोण -कोण ले बोल्श्यात ! पोरे बी आते वात्राले लागी जायेल शेतस. काम कमी नि उपाद्या जास्ती वाढी रायनात यास्न्या . बय, जवय पाईन आई फेसबुक उनं, तयीस्न्या भानगडी बी वाढाले लागी गयात , घरना कामे सोडीसन फुकट फौजदारक्या कराले सांगा यासले ! आतेच दाबाले जोय्जे नयी ते या हाथ मा येवात नईत. पोरी देणारा आतेच कन्हारा माराले लागी जायेल शेतस .या रिकामा रावाले लागी जातीन ते काय खातीन ? मुसाडामा ठिकाना नयी , अक्कल ना बक्कल तुटेल शेतस , आंग मा मावा नयी नि चालनात त्या भाऊगिरी कराले ! कोण -कोनले आवरशात? ,'' जादू न्हांजी बोलनात. त्या ''उबगेल गुरुप'' वालास्नी दर्जाले टांगीसन बठा वैतागवाडीवाला मोक्या व्हयी गयात. नि घरे घर पांगी ग्यात. -(c )-आपलाच दोस्तार : जयपाल सर ,वाठोडा ,शिरपूर 9422788740

Popular posts from this blog

''इबाक --तिबाक न्या गप्पा !''--लेखक: जयपाल सर

''दम खाय भिळू या दिन बी सरकतींन !'' ---कारभारी

''डरा सरकार आणि कारभारी ''