Advertisement


व्यसनमुक्तीच्या कार्याचा राज्यस्तरीय गौरव राध्येश्याम बंगाळे यांना राज्यस्तरीय प्रबुद्ध समाजरत्न पुरस्कार प्रदान..


साखरखेर्डा :प्रतिनिधी “गेल्या अनेक वर्षांपासून लोकसेवा व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी प्रयत्न करणारे व असंख्य तरुणांना व्यसनमुक्त करणारे साखरखेर्डा येथील लोकसेवा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक राध्येश्याम बंगाळे यांना नुकतेच नांदेड येथील नाना नानी पार्क याठिकाणी दैनिक प्रबुद्ध परिवार व प्रबुद्ध टेम्पल चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित  आयोजित दै प्रबुद्ध परिवार वर्धापनदिन सभारंभात ‘प्रबुद्ध भारत समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...

. हा पुरस्कार प्रा. विकास कदम (संचालक गुरुगोविंद पत्रकारिता महाविद्यालय ), संजय खाडे (संपादक दै. प्रबुद्ध परिवार ) व उपस्थित मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला.. राध्येश्याम बंगाळे यांना मिळालेला हा आठवा पुरस्कार आहे हा पुरस्कार नक्कीच व्यसनमुक्तीच्या कार्याला अधिक बळ देणारा आहे अश्या भावना बंगाळे यांनी यावेळी व्यक्त केल्या.. हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे बंगाळे यांचे चौफेर कौतुक होतं आहे...

Post a Comment

0 Comments