Wednesday, 20 April 2016

दये तिले कये नि फुकटी गोंडा घोये !" लेखक :जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे ,शिरपुर

दये तिले कये नि फुकटी गोंडा घोये !" लेखक :जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे ,शिरपुर कारभारी राजस्थान दौरा वर्तीन उनात म्हनिसन वैतागवाडी नि बठी ग्यांग कारभारी ले भेटाले उणी. च्या-पाणी व्हवावर जादू न्हांजीनि गावनी खबरबात दिनी. भारत म्याच हारीग्या यावर गावनी कडक ग्यांग उजी कुढापा करी रायनी या बारामा कानगी करी. ''अरे हार-जीत लागू र्हास, खे शे तो ! इतल्या म्याचा आपुन जीक्यात ,बाकीन्या त्यास्नी जीक्यात यामा काय बिगडस? "--कारभारी बोलनात. दंगल मामा नि म्हजार मा तोंड घालं---"आपली काय शान रायनी ,कारभारी ? नेम्मन खेतात ते कप आपलाच व्हता ना?" ''बय, याले उजी दुबुकड्या तोडानी सवय शे !", गुल्या भो "आपला काय अगला बाप नि ठेव ठेयेल शे का कपवर ? त्यास्ना कायनी जीव? त्यासले शिकाडाले तुमले वाट लावाले जोय्जे ! गिल्ली दांडू छाप , नेम्मन गिल्ली मारता येत नई नि चालना तो किरकेट न्या बात ठोकाले....! का मंडई खोट शे का ? खोट व्हई ते परत "--तुम्बालाल अप्पांनी भी आपल तुम्बेल तोंड मोके करी दिन . ''पिक ले भाव नई, गावे गाव पाणिनी बिफ्ता व्हयी रायनी , दिने दिन म्हागाई वाळी चालनी, पोरे शिकन सोडीसन न्यार-न्याऱ्या उपाद्या करी रायनात--- यांनी कोनले पडेल नई ! नि चिंता करी राय्नात त्या म्याच हारी गवूत त्यानी ! खाव्लाले देवाव शेत का त्या तुमले ? आसू गायतस?," कारभारी नि बी आपला मन मानी खदबद काढी टाकी. गप्पा गप्पास्मा आखो एक चर च्या ना व्हयी ग्या, मंडई नि राजस्थान दौराना फोटोक दखात. लोकेसले ख़ुशी व्हय्नी. कारभारीले फेसबुकवर दखिसन बठासले जास्ती ख़ुशी व्हयनी ...आते रोज कारभारी ना संग बात करता यी अशी पोरे-सोरेसले वाटण. गुल्याभो ना पोर्या पोपट बी तठे बठेल व्हता . कारभारी त्याले बोलनात--''दख भिडू ,साय मा नेम्मन ध्यान दिशि ते पुढे जाशी ....रिकामा कामे कराना नई ,गावनं नाव निन्गी अशी वागा ,तुमना पाईन मुकल्या आशा शेतीस आम्ले.'' ''कारभारी, तुमेन जे सांगतस ते आमेन नक्की आयॆक्सुत , आजना जमाना मा रीत नि बात करणारा लोके कमी शेतस नि बिगाड्णारा जास्ती शेतस ....!" पोपट नि बी आपल मत मांड ! सांडू भो --''कशा बोलणा भिडू ! औ पोरग्या कामना ना शे , त्यान बय त्या खोडाय रात दिन मोबाईल मा तीचीक तीचीक करी रहातस , त्या कटोरासनी अभ्यास मा ध्यान नई, आकड्या टाकामा पास शेतस नुसता !" "कारभारी, तुमेन व्हात्स अप वर फोटोक टाका ,आपला बाकीना देढशानासले बी सम्झाले जोय्जे !" पोपट नि कारभारी ले इनंती करी . "दख भिडू, आमेन एखादी चांगली पोस्ट टाकी का लगेच बाकींना दुक-- लागेल भराभर आथायीन तथायीन उचलेगिरी करिसन काही बी टाकी देतस , त्यामा आमेन काय लिखेल शे ते लोकेसले दखात नई , त्यामा आमेन अशा वायबार लोकेस्ना गम जास्ती ध्यान नई देतस , जो शिकी त्याले चांगल्या बाता सांगान्या , ज्या वायबार शेतस , त्यास्ना पुढे डोका फोडीसन बी कायी उपेग नई भो !", कारभारी नि आपली बात टाकी ."बय तो पिंट्या, कोठे भी गर्दीमा तोंड खुप्शिसन फोटोक काढी लेस नि त्याच-- त्या फोटो टाकीसन सोताना फोटोकले सोताच लाईक करस....... !"; गुल्याभो बोलणा. "मंग तून काबर पोट दुखस रय ? तुमना जुगाड्या बी पेपर मा नाव उन का सोताना नाव खाले लाल पेन वर रेघ मारीसन फेसबुक वर चीप्काडी रास. ," पिंट्याना जीजभाऊ लोट्या बोलना , आवरा रे येडास्वन, काय येरायेर नि खेसर करी रहातस . बठासले मोठा बनानी हौस व्हई जायेल शे , पण सोतानी काही बोंब पडत नहीं , नुसती उसनी घिसनी वर आपली कोयमी चिकनी करानी सवय पड़ी जाएल शे काही हुस्न्यासले ! सांडू भो नि त्या येडा दफड्यासले सूनाळ, तशी न्हांजी नि आपला मोबाईल मानि एक पोस्ट दखाड़ी , "दखा कारभारी , आयी ते तुमेन लिखेल व्हतं ना ? आणि त्या ''उसरट गुरुप'' माना तो शाना फिरंगी नि तुमनी पोस्ट टाकेल शे पण तुमनं नाव काढी टाकेल शे ! त्यान बय काय चोट्टा दुक लागेल शेतस भो ! " ''जाऊ द्या ,त्या "उबगेल गुरुप'' वालास्नी नवा गुरुप तैयार करेल शे त्यानं नाव ''उसरट गुरुपءء ठेयेल शे ! त्यासना दंधा शेतस उचलेगिरी कराना , हायबिरिड नि पैदास पाईन काय अपेक्शाव करश्यात ? त्यासले चमकानी हौस शे , आमनं नाव दखिसन अडचिन व्हई जास काही सुग्गड़स्नी ! एक बखत आमनी एक कविता एक बायजा नि तिनं नाव टाकिसन छापी दिनी , मंग काय गोट , मुख्य संपादक नि त्या बायजा ले फ़ोन करिसन अशी झापं व्हतं , तैस्न नाव काढत नहीं ! इतला शिकेल लिखेल शेतस नि एक लाईन लिखता येत नहीं , काय कामना शेतस या उसना लोके ? खुशाल दुसरानं वापरतस। यास्ना ड़ोक्सासमा काय अक्कल ना भोक्सा पड़ी ग्यात काय ? पण ज्यानी लिखं , त्यानं नाव काढी टाकानं म्हंजे आयी जास्ती आगावू पनानं काम शे ! पण मी चिंता करस नहीं , आपलं नाव बठी गम शे , देशना काना कोपरामा आपले वयख्तस , या फुकटखाऊ डिबरा तोंडघशे पडतिन، या जवय बी मना तावडी मा सापडतिन तवय सुटाउत नहितिन ، खबर राखस ! ," कारभारी नि आपलं दुखण सांगी टाकं ! तुम्बलाल अप्पा उठनात , " त्या फरारी काय शेतस आयी दुनिया ले चांगली माहिती शे कारभारी ! त्या हुलचिडयास्ना घरमा उन्दरे फार्कती मांगतस ! काय शे ---''दये तिले कये नि फुकटी गोंडा घोये !" ---आपलाच दोस्तार :जयपाल सर, शिरपुर

"साथ कोनले देवानी ? धरमनी का आद्रमी नि ?" -- लेखक : श्री जयपालसिंह गिरासे ,(वाठोडा) ह.मु. शिरपूर

उंडायाना दिन---सुनसान रस्ता----सरपंच साहेब नि आपला पोरग्या सना बाबाना इच्छाखातर गाव मा व्हाय-फाय चालू करी देयेल शे त्यामा वैतागवाडीना लोकेसले सध्या ''काम फद्यानं नयी नि रिकामपण घडीभर नं नयी !" अशी गत व्हई जायेल शे भोस्वन. मारुतीना पारवर कारभारी ,तुम्बालाल अप्पा, गोटन जीभो, जादू न्हांजी बठेल व्हतात. वरण-चिखल्या दाबिसन चेपेल व्हत्यात म्हनिसन तुम्बालाल अप्पानि ठायका एक कोपरामा तन्णाई देयेल व्हतं .
कारभारी फेसबुक आणि वात्रेल अप्स वर चांगलाच फैली जायेल व्हतात ....हफ्ताभर पाईन रात दिन फेसबुक आणि वात्रेल अप्स वरना म्यासेजसनी त्यासले गुंगायी टाकेल व्हतं . दिनभर मोबाईल नं रवण रई रायन्तात. 
''जादू भो, औ म्यासेज काय पटना नयी बरं आपुन ले !" --कारभारी बोल्नात .
''काय लिखेल शे कारभारी ? जराखं वाचीसन दखाडा नं ! मना चस्मा घर राही गया आज !"
तोंडमानी गुयनी फेकत तुम्बालाल अप्पा बी जागे व्हयी ग्या..! 
बठास्नी कान टवकारावर कारभारी वाचाले लागनात. ''दखा मंडई , या म्यासेज मा आऊ जुवान म्हणस--'' जर बीभिषण गद्दारी नयी करता ते रावण लंका नयी हरता , तो म्हणस घरमा भेदी व्हता म्हणून रावण युद्ध हरणा आणि मरणा व्हता.''
''त्यान बय, आयी उजी वाचले भेटी रायन!," गोटन जीभो बोलनात.
''या हुस्न्या बाटोड काय काय लिखतीन यांना नेम नयी , रीत नि दुनिया नयी रायनी मंडई! खोटं शे का ? खोटं व्हयी ते परत !", तुम्बालाल अप्पांनी बी मजारमा आपली पिंगानी वाजाळी. 
वैतागवाडी नि ग्रामसभाले आयी बात अज्याबात आवडनि नई. 
शेवट कारभारी बोलनात --" मंडई , बिभीषण आऊ जुवान खानदानी व्हता . त्यांनी धरम नि साथ दिनी. रावण आऊ जरी सग्गा भाऊ व्हता ,तरी त्याले बिभीषण नि गण समजाळ व्हतं. या उपाद्या करू नको रे , आखिर मा पसताशी अशी सांगेल व्हतं त्यानी. सग्गा भाऊ जरी व्हता तरी त्यानं लखन चांगलं नयी व्हतं . रावण आऊ एक नंबरना आद्रमी व्हता आद्रमी ! मंग या आद्रमी नि साथ देवानी का धरम नि साथ देवानी ? सांगा मंडई आते तुमेनच न्याव करा !"
बठी मंडई हाथ वरें करीसन बोलणी --''बिभीषण आऊ खानदानी व्हता , त्यानी जे करेले व्हतं ते नेम्मान करेल व्हतं. रावण आऊ पाप्पी धोत्रा आणि एक नंबरना आद्रमी व्हता .म्हनिसन बिभीषण ले गद्दार म्हणानं आणि त्याले घरना भेदी म्हनिसन त्यांनी बदनामी करांनी आयी बात चांगली नयी , कारभारी ठराव करा , सरकार ले पत्तर लिखा नि आऊ येडा-चाया थांबाळा म्हणा आते.."
''''दखा कारभारी , या उलटी फिटिंगना आणि बिन भेजाना गडबड्या गळू काय लिखतीन नि काय पसारतीन यांना नेम नयी , आयी बठ हायबिरीड नं बिवारं शे , हायबिरीड ना जमानामा बाजरीना तोटाले बी जुवारना कणसे लागतस म्हणे ,अशा आमना यायीना सालाना फुई-सासराना जवाईना डिकरा सांगी रायांता . '', तुम्बालाल अप्पांनी आपली मयमय मोकी करी. 
''पण मंडई , या चगेल भान्या काय बी लिखतीन नि अशाच देव-धरम नि इतिहास वर टीका करतीन ती आपुन अशीच सैन करांनी का ? मी मावालं रोकडा मत त्या ''खोडगाव'' वालास्ना ''उब्गेल गुरुप'' मा लिखं ते त्या अड्मीन नि आम्ले लगेच गुरुप माईन बायेर काळी टांकं हो ! काय नकटपण लागनं त्या बाटोडले काय माईत !"कारभारी नि आपली मन मानी बात सांगी. 
कारभारी नि त्या खोडगाव वाला ''उबगेल गुरुप'' वालास्ना चांगलाच पाटा पाडेल व्हता. त्या गुरुप माना दोन च्यार रीकामचोट रावण नि बाजू वढी रायन्तात . कारभारी त्यासले रावण ना डिकरा म्हनिसन मोक्या व्हयी गया, त्यास्न्या सगाया आते लंका मा कराना बी सल्ला दि टाका , आणि आपली खेड मा कोणता येडा तुमले पोर देस त्याले बी दखी लीसू , तुमले कुवारा खपाडी दिसू अशा धमक्या बी दि टाक्यात. कारभारी नि धमकीमा त्या फारमना कोंबडा दसात्रे पडी गयात नि त्यास्नी सयन-- सये आपला ''उबगेल गुरुप'' ले गळप करी टाका. 
''नॉट इज धिस ! तथायीन सुक्राम भाव्सायेब ना आवाज उना . त्यास्ना शिरपूर वाला धाकला पोर्यानी साम्सुंग ना मोबाईल दि टाकेल व्हता . सुक्राम भाव्साहेब बी ट्वेंटी ट्वेंटी नि गोट ले राम राम करिसन सध्या फेसबुक नि व्हात्स अप वर चांगलाच रमी जायेल व्हतात . सुक्राम भावसाहेब ले बी त्या ''उबगेल गुरुप'' वालास्नी पोस्ट अज्याबात पटनी नयी . संताप मा भावसाहेब नि पायरीवर टेकं. आपली स्टाईल मा बिळी चेटाडत बोलनात ," अं---आयी चांगलं नयी बरं...! म्हणजे काय बी लिखतीन का ? डोकं शे का यासले ? अकला शेतीस का ? धरम नि साथ देनाराले बी गद्दार म्हणाले लागी गयात ! त्यास्नी दिना आद्रमी मारू यास्नी आद्रमिस्नी ! ," सुक्राम भावसाहेब नि बी आपली मयमय काळी टाकी.''त्यास्ना भेजा मा फाल्ट व्हयी त्यामा अशा उचकेल ना गत काय बी लिखी रहातस या .....हुस्न्या यास्नी हुस्न्यास्नी ! फुका त्यासनं दर्सन , बठी गम आयी हागणखळी माती जायेल शे , कोण -कोण ले बोल्श्यात ! पोरे बी आते वात्राले लागी जायेल शेतस. काम कमी नि उपाद्या जास्ती वाढी रायनात यास्न्या . बय, जवय पाईन आई फेसबुक उनं, तयीस्न्या भानगडी बी वाढाले लागी गयात , घरना कामे सोडीसन फुकट फौजदारक्या कराले सांगा यासले ! आतेच दाबाले जोय्जे नयी ते या हाथ मा येवात नईत. पोरी देणारा आतेच कन्हारा माराले लागी जायेल शेतस .या रिकामा रावाले लागी जातीन ते काय खातीन ? मुसाडामा ठिकाना नयी , अक्कल ना बक्कल तुटेल शेतस , आंग मा मावा नयी नि चालनात त्या भाऊगिरी कराले ! कोण -कोनले आवरशात? ,'' जादू न्हांजी बोलनात. त्या ''उबगेल गुरुप'' वालास्नी दर्जाले टांगीसन बठा वैतागवाडीवाला मोक्या व्हयी गयात. नि घरे घर पांगी ग्यात. -(c )-आपलाच दोस्तार : जयपाल सर ,वाठोडा ,शिरपूर 9422788740

पानी व्हाई ते कहानी जीत्ती राही ! लेखक : जयपालसिंह गिरासे ,शिरपुर

यंदाना उंडाया उजी गांजी रायना. रातले झी टी व्ही वर लातूर वालास्ना पाणीना हाल दखात . मंडई ,सदा कारभारी आणि वैतागवाडीनी मंडई चिंता मा पडी गई . तपेतना काठवर शेतस ,आपला नेतास्नी पाणीनी चांगली सोय करी ठियेल शे ते आपलं गाडं नेम्मन चालू शे नईते आवसूंग खखाना उडी जाता .राज्यामा बाकी गम पाणी कम शे म्हणीसन वैतागवाडीना लोकेस्नी रंगपंचमी सादी भादी मनाडी. सकाय सकायमा कारभारीले गडेरमा लोयाडी दिंतं म्हणीसन आंगाडे धवामा नी कपड़ा धोना पडात त्यामा लटकनबाईन्या गाया खावामा रंग ना बेरंग व्हई गयथा. म्हणीसन बठा जन कारभारीना घर ना दारशे पार वर जमनात . कपडा वल्ला आणि बाहेर गदारा त्यामा कारभारी उघडा बंब बशेल व्हतात . मंडई ले दखिसन बठासले टेका अशी सांग , गप्पा सुरु व्हयन्यात.
"दखा मंडई,जे झायं ते झायं ! आपला गावमा पाणी गन शे !
 ते कायम टिकाळी धरा . बाकी गम उजी हालत चवनी शे .
पानी बचाडा ,"" कारभारी बोलनात . कारभारीनी बात तुम्बालाल अप्पालेबी पटनी. "आयी बात लाखनी बोलनात कारभारी तुमेन ! बरेडमा उजी हाल शेतसं . पाणीना नेट्मा सगाया व्हयी नई रायन्यात तिबाक ! ",तुम्बालाल अप्पा .
"आमना यायी ना जागे इकतनं पाणी पेनं पडी रायनं ,पावना परवङतस नईत ",जादू न्हांजी नी बी आपलं मत मांडं!
गोटन जिभो ,"'देसमा काय हाल शेत यानी चिंता नई कोनले, वायहुल्यास्नी गत बोंबा ठोकी रायनात बाकीना लोके ,त्यान बय त्या टी वी वाला हुलचिडया बी त्या रिकामचोट बातम्या यायभर दखाडतस! काय व्हईन नी कवय यास्ना डोया उघळतीन ,राम जाने, ज्या लोके देसना करता इंग्रज सरकारनं संग झगडनात त्यासले सुद्धा या वैरीना सोडतस नयीतीन , साधी गोट शे का ? यासले ते टायर मा उलटा टाकी टाकी बपकाडाले जोयजे का नई ! आणि लोके यासले शिदा सोडतीन का ?"
"अज्याबात नई ,जीभो ! लोके त्यासले धडा शिकाडा शिवाय रावात नयीत ," जादू न्हांजी .
"त्या बाटोड निय्या मा चरी रायनात ,त्यासले काय डिबरास्ले ! बिफता गरीबन्या शेतीस ! ", गुल्याभो नी मजारमा काडी चेटाडी .
"बय कालदिन साधी पानीनी नासाडी करेल शे का ? त्यास्नी आंडेरणा बाट्तोड मारू यास्नी बाट्तोडस्नि, यासले काय पडेल नयी देस्नी , पाणी नै भेटाव तवय का त्या बारामातांबू पितीन ? , का मंडई , खोठ शे का ? खोठ व्हयी ते परत !", तुम्बालाल अप्पांनी आपली मयमय काढी टाकी .
सांडूभो नी बी आपलं मत मांडं - ," गावगावमा पाणी अडावाले जोयजे,जीमीन मा पानी जिरावाले जोयजे ,वावरेस्मा डिरीप वापराले जोयजे,तवय कोठे वाची ,नई ते मंग बठा कोल्ला मरी जातीन ,"
"लटकन व्हऊ, आमले च्या बीई पाजशी का नई ?," बकाराम दाजी बोलनात .
"घरेघर जावा, पानी बचाडनं शे ना ? च्या ठेवामा ,बशा- बोगणं धवामा पाणी नई वायबार जावावं का ?",लटकन व्हऊ ना चटकन जबाब ऐकीसन बठी मंडई फटकन उठनी नी घरेघर नयकी गई !
"च्या कशी बन्नी मंग जिभो ? गोड का मयकी ?", गुल्या मज्या लेवाले लागी ग्या . आते गोटन जिभो काय बोलनात ते काय तुमले सांगामा मज्या नई बरं भोस्वन !
आपलाच दोस्तार-जयपाल सर ,वाठोडा(शिरपूर)

'' वाटा पेंडा नि ठोका मेंगरा !" ---जयपालसिंह गिरासे ,शिरपूर


दुपारनं वखत ले वावरणा मेर वर मंडई बठेल व्हती ! येडा बाबुईना झाडना खाले कारभारीनि आपलं बस्तान मांडेल व्हतं! तथायीन सुक्राम भाऊसाहेब उनात . रुमाल मा गीलोड्या , मक्कीना भूनका बांधीसन घर चालना व्हतात. बदामभो उब्गेल केंद्रावर आपला रेडूमा पवाडा आय्की रायन्ता. भावसाहेब ले दखीसन कारभारी उठी बठ्नात. 
''कोठे गयतात भाव साहेब ? एव्हढा उनमा?" 
"दखू , म्हणतं काय सापडस का ? चावदस व्हस तव काय टाया नही , रोज रोज दाय साय खाव्लामा तोंड वर खुरी चढी जायेल शे, दाम्याना मयामा आयी बारदान सापडनं, पोरे भी घर खाव्लाले नखर-चखर करतस, उंडायामा भाज्या सापड्तीस नहीत."
"आपला टाईम चालना गया, आपुन धाकल्ला व्हतुत तवय रोज उठी खाव्लाले 'मेंगरा नि लाल मिर्चीस्ना पेंडा' राहे. कदी मदी चार पावना येयेत ते एक दोन पोई भेटे. दिम्मय ले महिनामा एकाद दाव 'दान' वैरेत ते न्हान्लास पाईन शान्लास लगा बठा खुस रायेत. रगडी मशिसन खायी पीई मोक्या रायेत बठ्ठा जन ! बय, एकादा वाढा भेटे तरी आवरायेत नैत लोके", कारभारी नि जुनी गोट खाजी. 
सुक्राम भाव साहेब --'' आणि आतेना डीबरा, खावलाले निय्यामा शेतस तरी चाया करतस. यासले पावभाजी , पिझ्झा , चिल्ली द्या खाव्लाले ! मेंग्रासले या डंगरा तोंड नयी लावात, या कितला भी चरतीन तरी समाधान नै व्हत त्या फिरंगीसले "
"आपला टाईम गया हो , त्या दिन आते येवात नहीत नि तशी मज्या बी भेटाव नही. तुमले आठस का ? एक बखत बिजासन ले मानता व्हती ! गोबा धल्लाना नातुनी! आपुन तवय चवथी पाचवी मा व्हतुत. वाढणारा बठा खवडी ग्यांग वाला व्हतात. थोबडा दखी दखी वाढेत त्या. उत्तम मामा ठुस व्हता. दौल्याना हाथमा बादली. ......उत्तम मामा नि दौल्या जुना बैठक वाला बाटलीबाय ! दौल्यांनी उत्तम मामाना ताट आक्खं बोट्यास्न भारी दिनं, आपली लाईन मा नावले दाद्या एक दोन बोट्या झटकि गय्था तो ! इज्या मन गम दखाले लागी गया , इज्या नि दौल्याले डोकं लायी दिनं! बय त्या काया डेडोर नि उजी जीव्वर उणी नि त्यास्ना ग्यांग वालास्नी लगोलग बादल्या खाले ठी दिन्यात. त्यास्नी अशी दोन च्यार लाग्नेस मा बी अशी करेल व्हतं ! उत्तम मामा ना बी नाक्नी बोंडी वर घाम उना. तो इतला डामाडोल व्हता , ते त्या घाई खाव्लायी नी रायंत .'भरी गयी बोय्की नि खीर झाई मय्की' अशी गम्मेत व्हाई जायेल व्हती त्यांनी. ताटमान्या बोट्या धरयात नि इज्याना ताटमा फेकीसन बोलना, " खाय , कितल्या खाशी ते !" इज्या बी न्हाणा बाक्खर , बठ्या बोट्या कावरेल ना मायक खावली गय्था , उत्तम नि सायकल पंचर करीसन घर पयी गय्था ! " , कारभारी नि जुनी गोट सांगतास सुक्राम भाव साहेब पोट धरी धरी हसाले लागनात. 
"आज न्हान्जी नि तुम्बालाल अप्पा काय उनात नहीत. सांगेल ते व्हतं मी त्यासले" , बदाम भो बोल्नात. बातच काढी तव्सुंग फाटाना गम्तून आवाज उना , " डू, एस्कांडा---फारदा----नारदा ---पिलारदा ; याम्म्मा कोचा !" 
"काय चाली रायनं भावसाहेब तीबाक ? वैदू येयेल शेतस का काय ?", कारभारी नि इचारं. भाव साहेब नि लगेच जबाब दिना , "तुंबालाल अप्पा भी त्या वैदुस्ना जागे बठेल शेतस, त्यास्ना उसमा उजी रान डुकरे पयकी जायेल शेतस , आज दिम्मय लगून एक दोन ना पसारा पाडतीन म्हणजे पाडतीन !" 
"मंग तुम्बालाल अप्पाले काय आपला याद नही येवाव भो ! आज ते खुरी मोकी करी म्हणजे करी गडी! न्हांजीना काय तपास नही. कथा बिथा फरार व्हयेल शे कोनजान? ", बदाम भो नि पुस्ती जोडी. 
''न्हान्जी आज डोखीन दखाले जायेल शे , सरकार नि वायदा करेल शे , आज एक दोन जायामा साप्डी म्हणजे साप्डी," भावसाहेब बोल्नात. 
कारभारी बी घर जावाना कुर्ता उठ्नात तशी मंडई भी रस्ताले लागणी , जाता जात कारभारी बोल्नात ---
"मज्या शे मंग गड्यास्नी ! बय , आपले अजून चावदस लगा वाट दखनी पडी, तव्लूगा खुशाल '' वाटा पेंडा नि ठोका मेंगरा !" ----आपलाच दोस्तार : जयपाल सर

Thursday, 7 February 2013

"विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत घडविणे हि आपली जबाबदारी....!"
 

Sunday, 9 December 2012

अविरत जे झिजले कण-कण ......व्यर्थ न हो तयांचे जीवन !

स्व.भाऊसो . पद्मसिंह सिसोदिया (पदम मास्तर) 
काही गावे अशी असतात की , जांच्या वरून मानसं ओळखली जातात.....परंतु काही माणसे अशी असतात कि जांच्या वरून गावे ओळखली जातात.....अशीच एक ओळख निर्माण केलेले किंबहुना ज्यांच्या नावावरून सुराय ह्या गावाचे नाव अखिल भारतात ओळखले जाऊ लागलेले होते त्या गावाचे आद्य नागरिक.....जनसंघाचे जेष्ठ नेते तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक म्हणून स्व. भाऊसाहेब  पद्मसिंहजी नाटुसिंहजी सिसोदिया उर्फ पदम मास्तर यांचा परिचय देता येईल.
  भाऊसाहेबांचा  जन्म २ जून १९२० रोजी त्यांच्या आजोळी अहिल्यापूर (ता.शिरपूर) येथे झाला. त्यांचे घराणे सुराय  येथील जमीनदार घराणे म्हणून ओळखले जाई. पाच भाऊ आणि पाच बहिण अशा एकूण दहा भावंडा मध्ये भाऊसाहेब हे थोरले होते. गोकुळा सारखे मोठे घराणे व भरपूर जमीन-जुमला असल्याने दारी वैभव नांदत   होते. लहान पणापासून जोर-बैठका ; घोडेस्वारी, तलवारबाजी, लाठीमार, पोहणे आदी मर्दानी प्रकारात त्यांनी आपले नाव कमावलेले होते. लाठीमाराच्या कौशल्याबाबत तर त्यांचा हाथ कोणीही धरू शकत नव्हता ....या कलेमुळे अनेकदा त्यांचा चोर व गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा प्रतिकार करताना उपयोग झालें होता. भरपूर व्यायामामुळे त्यांनी बलदंड शरीर यष्टी कमावलेली होती.  त्यांचा आहार पाहून भले-भले पहेलवान दचकत असत. ते कधीही आजारी पडलेले  नव्हते. कच्या भाज्या आणि चणे-शेंगदाणे हा त्यांचा खुराक होता.घरीच प्राथमिक अक्षरे गिरवल्यानंतर पुढील शिक्षणासाठी धुळे येथील इंग्रजी शाळेत त्यांचे नाव दाखल करण्यात आले होते . जुनी matrik  पर्यंत शिक्षण त्यांनी घेतलेले होते. लहानपणी आज्ञाधारक बालक म्हणून ते ओळखले  जात. सुटीत धुळे येथून परत येताना त्यांच्या जवळचे भाड्याचे पैसे एका गरजू मुलास त्यांनी दिले होते व स्वत: पायी प्रवास केला होता या वरून बालपणीच दातृत्वाचे संस्कार त्यांच्या मनावर किती खोलवर रुजलेले होते याची प्रचीती येते. परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजी यांनी संघाची उभारणी जोरात चालविलेली होती.
धुळे येथील संघाच्या शाखेचे ते प्रथम स्वयंसेवक होते.  संपूर्ण परिसरात ते मास्तर म्हणून परिचित होते.

घरचे जमीनदार असल्याने व त्या काळात  नोकरी कमी प्रतीची मानली  जात असल्याने शेती साठी ते घरी परतले. स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी पुणे येथे  संघ शिक्षक म्हणून  अल्प काल सेवा बजावली होती. संघाचे विविध शिबिरे देशभर होत....भाऊसाहेब प्रत्येक शिबिरात सहभागी होत.  १९४४ मध्ये सुराय  या आपल्या गावी त्यांनी संघाची शाखा सुरु केली .... या शाखेत गावातील मुले आणि युवक मोठ्या उत्साहात सहभाग घेत.....राष्ट्रभक्तीचे संस्कार त्यांनी आपल्या मातीत रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो काल पारतंत्र्याचा होता.....नेताजी बोस यांचे चरित्र त्यांना नेहमीच खुणावत असे.  भूमिगत कार्यकर्त्यांच्या निरोपाची ने-आन त्यांचा बाल चमू शिताफीने करीत असे....इंग्रज पोलिसांची नजर त्यांचेवर नेहमी असे परंतु त्याचा थांगपत्ता ते कधीही लागू देत नसत. नागपूर येथील ओ.टी .सी. शिबिरात सहभागी झाल्यानंतर धुळे जिल्हा संघचालक म्हणून त्यांनी यशस्वी रित्या जबाबदारी पार पाडली. या काळात संघाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांच्या संपर्कात ते असत.  १९४८ मध्ये गांधी हत्येनंतर संपूर्ण देशभर धरपकड करण्यात येत होती......त्यात भाऊसाहेब सुद्धा चार महिने तुरुंगात होते. स्वताची धर्मपत्नी वारल्या तरीही सरकार ने त्यांची parol वर सुटका केली नव्हती. तुरुंगवासातून परतल्यानंतर भाऊसाहेब गावो-गावी गेले व संघाच्या शाखांची उभारणी जोमाने केली. याच काळात त्यांचा रामी येथील जमीनदार स्व.इंद्रसिंग जी जाधव यांची कन्या रुखत कुंवर यांचेशी दुसरा विवाह झाला.
१९५२ च्या दुष्काळात लोकांना मदत म्हणून गुरांची छावणी निर्माण करून मुकी जनावरे वाचविण्याचे प्रयत्न केले. दुष्काळी केंद्र उभारून  रेड-क्रॉस च्या मदतीने दुष्काळ ग्रस्तांना धान्य -कपडे- दुध-भाजी भाकरी आदी वाटप त्यांनी केले.  घरचे जमीनदार असलेल्या भाऊसाहेब यांनी गोर-गरिबांसाठी आपले धान्याचे कोथर सदैव खुले ठेवलेले होते.....त्यांच्या पूर्वजांना कवाड मध्ये मिळालेली जमीन जेथे होती तेथे आदिवासी भिल्ल जमातीच्या लोकांची वस्ती त्यांनी वसविलेली होती...जी मंडळी त्यांच्या शेतांवर काम करीत असे. कवाड  या नावावरून त्या गावाचे नाव कवाडे व नंतर कलवाडे असे झाले. या संपूर्ण वस्तीत भाऊसाहेब यांचा  पितृवत सन्मान केला जाई. त्यांनी तालीम दिलेले ;शिक्षणात मदत केलेले अनेक जन आज महत्तम पदांवर पोहोचलेले आहेत.  एका हथाने दिलेले दान दुसर्या हातालाही ते कळू देत नसत. सायकल हे त्यांचे आवडते वाहन. पुणे-मुंबई-धुळे येथे ते आवर्जून सायकलीने जात असत. 
१९५९ मध्ये सुराय ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्या काळात लोकसहभागाने गावातील प्रश्न त्यांनी सोडविले होते. आपल्या सरपंच पदाच्या काळात त्यांनी घरून जेवणाची सोय करून गावकर्यांच्या मदतीने सुराय  ते मालपुर अशी चार कि.मी. लांबीची सडक तयार केली होती. गावात शाळा सुरु केली.अधिकारी वर्गात त्यांच्या प्रती प्रचंड आदर व दरारा होता. १९६२ मध्ये त्यांचे स्नेही उत्तमराव पाटील यांनी लोकसभे साठी तर भाऊसाहेब यांनी विधान सभेसाठी जनसंघातर्फे दिवा या चिन्हावर निवडणूक लढविली. तेव्हापासून जनसंघाचे नेते म्हणून त्यांनी कार्य सुरु केले. परमपूज्य हेडगेवारांच्या जीवनापासून आदर्श घेतलेले भाऊसाहेब १९७६ मधील आणीबाणी च्या काळात कारावासात होते. याच कालात त्यांची अटल बिहारी वाजपेयी ; मोरोपंत पिंगळे;नानाजी देशमुख ; रज्जू भैय्या ;हशू अडवाणी आदी मंडळीच्या सहवासात  कालक्रमणा सुरु होती.  राजकैदी म्हणून नाशिक च्य कारागृहात आठ महिने ते होते....तत्पूर्वी दहा महिने भूमिगत राहिले....व लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे सोबत तीन दिवस थांबून नागपूर ---गोरखपूर--पुणे--मुंबई--ग्वाल्हेर--जयपूर इ. ठिकाणी त्यांनी भूमिगत राहून प्रचार केला. रामी येथे एका पारवारिक समारंभास आलेले असताना गावातील फितूर लोकांनी पोलिसांना गुप्त रित्या माहिती पुरविली आणि भाऊसाहेब यांना अटक झाली.
गरजवंतास मदत करणे; दुर्बलांचे रक्षण करणे ;प्रसंगी लोकहितासाठी पदरमोड करणे ;गोर-गरिबांच्या दु:खात सहभागी होणे हि त्यांची खास वैशिष्ट्ये सांगता येतील.  त्यांचे शेतीवर केलेले प्रयोग पाहून अनेक शेतकरी थक्क होत.  विविध प्रकारची फुलझाडे; फळ झाडे; आमराई; भाजीपाला; कोंबड्या-शेळ्या -ससे --कबुतरे आदींची मळ्यात रेलचेल असे.....त्यांचा मला म्हणजे भरलेले गोकुळ वाटे....अनेक दिग्गज मंडळी त्यांच्या शेतावर येवून गेलेली होती....भाऊसाहेब यांना फक्त दोन कन्या होत्या मोठी आशा व लहान लता. भाऊसाहेब यांनी आपल्या मुलींवर हि उच्च संस्कार केलेलं होते.  जावयांवर  हि निस्सीम प्रेम केलेले होते. त्यांचे मोठे जावई श्री गोविंद सिंह हे होळनांथे गावात शेती करतात तर लहान जावई श्री रणवीर सिंह हे मुंबई येथे मंत्रालयात अधिकारी होते. आपल्या साडू चे चिरंजीव स्व.विक्रमसिंह हे मालपुर येथे शिक्षक होते. श्री विक्रमसिंह गिरासे यांचेवर पुत्रवत त्यांनी प्रेम केलेलं होते. श्री लखन जी भतवाल; स्व.उत्तमराव पाटील; स्व.दिलवरसिंग पाडवी ; स्व.प्रल्हादराव पाटील; नारायण फौजदार; स्व.रजेसिंग गुरुजी ; स्व.अजबसिह भाऊसाहेब ;नानाजी जोशी आदी त्यांचे खास स्नेही होते. मालपुर येथील स्व. मेजर साहेब; स्व.तखतसिंहजी रावल; स्व. विजयसिंहजी रावल आणि स्व. नरेंद्रसिंहजी रावल आदी त्यांचे परम मित्र होते. त्यांनी राजकारण विरहीत मैत्री जोपासली होती.  आपल्या आयुष्यात निस्वार्थी पणे  सदैव कार्यरत ते राहिले.  कधीही जमा-खर्चाची तमा केली नाही.....भौतिक जीवना पेक्षा निसर्ग सहवासाचा त्यांना अधिक ध्यास होता. शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप हि त्यांची दैवते. त्यांचा आदर्श त्यांनी नेहमी जोपासला. ओठात एक अन पोटात दुसरे असा त्यांचा स्वभाव नव्हता.
विजयादशमी च्या आदल्या रात्री त्यांनी गावातील स्वयंसेवकांना सूचना केली कि उद्या आपणास शस्र-पूजन आणि सामुहिक संचालन करावयाचे आहे...म्हणून तयारी करून ठेवा .....दुसर्या दिवशी पाहते ते झोपेतून  उठले व घरगडी अंगणात शेणाचा सडा  टाकत होता ...त्याचेशी बोलत असताना भाऊसाहेब ओट्यावर बसले ते पुन्हा कधी हि न उठण्यासाठी......! विजयादशमी च्या दिवशी सकाळी दि.१४/१०/२००२ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. भाऊसाहेब यांच्या अंत्ययात्रेत हजारो लोकांनी सहभाग घेतला होता....सजविलेल्या वाहनावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आलेले होते....त्यांच्या अंत्ययात्रेत गणवेशधारी स्वयंसेवकांनी संचालन केले होते.
-------शब्दांकन: श्री. जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे ,शिरपूर जि .धुळे (महाराष्ट्र) मो:९४२२७८८७४०
(लेखक हे स्व.भाऊसाहेब यांचे नातू आहेत)

Tuesday, 30 August 2011

कट्ट्यावरचे शब्दबाण....!अलीकडे अनेक  महर्षी उदयास येत आहेत.चरित्र आणि चारित्र्य नसणारी.......ज्ञानाचा कोणताही लवलेश किंवा पात्रता नसणारी मंडळी विविध  क्षेत्रात  शेफारत आहे. नुकतेच  बाबुश नावाच्या  एका  इसमास   कस्टम च्या लोकांनी जेरबंद केले. म्हणे त्याच्या थैली    मध्ये करोडो रुपयांचे परकीय चलन होते. हा इसम कोणी चोर व दरवडेखोर नाही तर ते महाशय चक्क गोवा  राज्याचे शिक्षण मंत्री आहेत म्हणे. बहुदा शिक्षण क्षेत्राच्या प्रसारासाठी त्यांनी हे धन संकलित केले असावे.....पूर्वी आपले थोर समाज-सुधारक  सुद्धा जनते कडून द्रव्य गोळा करून गरीब मुलांच्या शिक्षणाची तहान भागवीत होते. कदाचित बाबुश महोदयांना देखील अशाच ज्ञान मंदिराचा पाया घालायचा असेल म्हणून त्यांनी द्रव्य संचय करायला सुरुवात केली असेल. द्रव्यसंचय करणारा फक्त अलम दुनियेत बाबुश साहेब एकटा नाही तर अक्ख्या दुनियेतील मंत्री आणि बाबू लोक असतील.......दुर्दैवाने बाबुश सापडला पण बाकीच्या बाबूंचे काय......?
सांप्रत चा इतिहास आम्हाला बदलावा लागेल......सुरेश कलमाडी, ए.राजा, बाबुश ह्या मंडळी ने नवनवे उच्चांक मोडलेत.........आदर्श तर सर्वश्रुत आहेच.........आहे रे- नाही रे नावाची दरी वाढत आहे......ज्याच्या हाती सत्तेचा पंदा  आहे त्याची चलती आहे......परवा--परवा तर विरोधी पक्ष हि डील होऊ लागलेत....अशी बातमी ऐकायला मिळाली.....सुपाऱ्या घेऊन आरोप करणे.....चौकशीचे आणि बदनामीचे शुक्लकाष्ठ मागे लाऊन आपले इप्सित साधू पाहणारे शुद्र  राजकारण ह्या महाराष्ट्रात फोफावू लागले.......सार्वजनिक जीवनातील शुचिता आणि नीतिमत्तेचा अंत झाला कि काय असे वाटू लागते.....जळगाव जिल्ह्यातील एका आमदारावर तर चक्क बलात्काराचा आरोप झाला.......पक्षाने तातडीची कार्यवाही केली म्हणजे पाणी कोठे तरी मूरत आहे हे निच्छित......!  ज्याला लोकशाहीचा चौथा खांब आम्ही म्हणतो ....जे स्वतःला समांतर न्यायालय समजून आपले विचार वाचकांवर किंवा प्रेक्षकांवर लादत  असतात त्या वृत्तपत्रे आणि वाहिन्यांची विश्वासार्हता हि संपण्यात जमा झालेली आहे.पीत पत्रकारितेला उत आलाय . नको त्यांना प्रसिद्धी देणारे हे बोल=घेवडे लोक फार शिरजोर झालेत. हि दांभिक मंडळी स्वतःला आजचे चित्रगुप्त समजायला लागली आहे.इतरांचे भविष्य आणि भाकीत वर्तवायला लागलीये...आंधळ्यांनी हत्तीचे स्पर्श करून आपले अनुमान सांगावे अशीच गम्मत ह्या मंडळींची हि झालेली आहे. हफ्ते आणि तोडी-पाणी च्या बाबतीत तर त्यांनी गुंड वा पोलीस लोकांना हि मागे टाकलेय ........अण्णासाहेब हजारे मुळे माहिती अधिकार कायदा लागू झाला पण त्याचा उपयोग केवळ तोडी-पाणी साठी किंवा त्रास देण्यासाठी होतो आहे....  ज्याचं नाव घेऊन आम्ही जयजयकार करतो.....आमच्या छात्या फुलून येतात....गर्वाने माना उंचावतात त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात असे प्रकार होताहेत हेच आमचे दुर्दैव.......! जर महाराज असते तर ह्यांचा कडेलोट केला असता........! प्रत्येक सात्विक मनाला प्रचंड संताप येत असतो. हा संताप आमचे तरुण जिम मध्ये जाऊन बॉक्सिंग च्या थैलीवर किंवा व्यायामात जिरवतात ......आमच्यासारखे आर्कुट/फेसबुक/किंवा ब्लोग वर व्यक्त करतात. एकीकडे इजिप्त,लिबिया,सिरिया तील क्रांती चा अंगार तप्त होत असतो...दुसरीकडे क्रिकेट चा वर्ल्ड कप जिंकण्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी फटाक्यांची आतिश बाजी होत असते.....आणि या सर्व भाऊ गर्दीत आम्ही मूळ समस्या विसरून जात असतो. जनतेला जणू सार्वजनिक डीमनेशिया झाला आहे काय अशी शंका वाटू लागते.याही परिस्थितीत अण्णा हजारे जंतर-मंतर वर उपोषणाचा एल्गार  करतात........सुप्त होत जाणारी------धूसर होत जाणारी आशा पुन्हा जगू लागते......!  उपोषण सुरु होते....सम्पूर्ण  देशभर   वातावरण ढवळून निघते.... "मी अण्णा हजारे आहे !" नाव असलेल्या टोप्या सगळीकडे दिसू लागतात.....कालपर्यंत जी तरुण पिढी बिघडली असा आरोप होत होता...तीच तरुण पिढी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या समर्थन साठी गावोगाव  प्रभात फेरी काढते....!  दूरचित्रवाणी ,वृत्तपत्रे आदी चर्चेची गुऱ्हाळे सुरु करतात....! अगदी चित्रगुप्त सारखा आव आणून काही मंडळी आपले भाष्य करीत असते......! सरकार काही ना काही अपशकून करून हे आंदोलन शमवू पाहत होते, परंतु वाढत्या जनरेट्यापुढे  नमते घ्यावे लागले......अण्णांशी बोलणी करून उपोषण थांबविले गेले.....आता मिडिया चर्चा करू लागली आहे कि फेसबुक ,आर्कुट ,गुगल सर्च आदी ठिकाणी अण्णा हजारे नामक व्यक्ती ने लोकप्रियतेचे सारे रेकॉर्ड मोडीत काढले.......हतबल कॉंग्रेस......असमर्थ आणि पोखरलेला ..दुबळा विरोधी पक्ष....साऱ्यांना   आश्वस्त करू शकेल अशा नेतृत्वाचा अभाव....तरीही    ७४ वर्षाचे राळेगण सिद्धी चे अण्णा दिल्लीच काय देशातील प्रत्येक गल्ली-गल्लीत चर्चिले जातात....कट्ट्यावर आशेचे निखारे पेट घेऊ लागतात ......पुन्हा नसा-नसातून रक्त सळसळू लागते....  मुठा आवळल्या जाऊ लागतात.....तोंडातून जोरात शब्द बाहेर येतात...."जय हिंद....!"
---------जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे,
५०, विद्याविहार कॉलनी,शिरपूर 
९४२२७८८७४०