चोपडा( प्रतिनिधी) -- अमळनेर येथील प्रख्यात मंगळ ग्रह मंदिराला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी माता मंदिराच्या पुजारी श्रीमती उर्मिलाताई अविनाश भाटे यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह भेट दिली. मंगळ ग्रह बाबत सविस्तर माहिती मंदिराचे डेटा मॅनेजर एमडी तायडे यांनी दिली. मंदिर व तेथील प्रशासन आणि व्यवस्था पाहून आपणास खूप आनंद झाला. अशा शब्दात उर्मिलाताई भाटे यांनी येथील व्यवस्थेविषयी समाधान व्यक्त केले.
उर्मिला ताई पाटील यांच्यासोबत प्रतिभा भाटे, प्रज्ञा पुजारी कवी रमेश पाटील, अमळनेर येथील ह. भ. प. निर्मलाताई पाटील हनुमंत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. "ढुईका" काव्यसंग्रहाची प्रत भेट म्हणून यावेळी कवी रमेश पाटील यांनी तायडे यांना दिली.


0 Comments