परतीच्या पावसाची चोपड्यात हजेरी --चोपडा (प्रतिनिधी) संपूर्ण तालुक्यात भाद्रपद महिन्याचे ऊन यामुळे शेतकरी व शेतमजूर हैराण झाले असून आज दुपारी अचानक आलेल्या परतीच्या पावसामुळे वातावरणात काही वेळ थोडासा गारवा पसरला व हायसे वाटले. भाद्रपद यंदा बऱ्यापैकी जाणवू लागला असून, उन्हाच्या कडाक्यामुळे शेतकरी व शेतमजूर हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत खरीप हंगाम आवरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत पावसाचाथोडा शिडकावाही मनाला प्रसन्नता आणतो.
0 Comments