सहाय्यक प्राध्यापक व पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र; विद्यालय, संस्था व विद्यार्थ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव आडगाव, ता. चोपडा, जि. जळगाव : दि. 09 सप्टेंबर 2026 रोजी NTA (National Testing Agency) मार्फत घेण्यात आलेल्या UGC NET 2026 परीक्षेत इंग्रजी विषयातून आडगाव हायस्कूल, आडगावचे मुख्याध्यापक श्री. कैलास उत्तम मगरे यांनी यश संपादन केले आहे. या यशामुळे श्री. कैलास मगरे हे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तसेच पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळत शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असताना त्यांनी मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाच्या माध्यमातून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून, शिक्षकवृंदाकडून तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री. कैलास मगरे यांच्या या यशामुळे आडगाव हायस्कूलच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
0 Comments