संत शिरोमणी सावता महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा दिनांक ११ / ८ / २०२६ मंगळवार या दिवशी आनंदात जल्लोषात भक्तीभावाने श्रध्देने धार्मिक आध्यात्मिक वातावरणात साजरा होत असून माळी समाजाचे परम दैवत संत शिरोमणी सावता महाराज यांनी आपल्या कार्याला सेवेला श्रमालाच महत्व दिल. श्रीक्षेत्र पंढरपुर येथे पांडुरंगाच्या दर्शनाला भेटीला सावता महाराज कधीही गेले नाही जगाचा मालक चालक पांडूरंग विठ्ठल प्रत्यक्ष सावता महाराजांना दर्शन देण्यासाठी भेटीसाठी स्वःता येत असत सावता महाराज यांना शेतात मळ्यात पिकात भाजीपाल्यात साक्षात भगवंताचे दर्शन होत अस सावता सागर प्रेमाचे आगर. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी......
असे सुंदर सुंदर अभंगांची रचना सावता महाराजांनी केलेली आहे संत शिरोमणी सावता महाराज संजीवन सोहळ्या निमीत्त विनम्र अभिवादन...

0 Comments