चोपडा (प्रतिनिधी) :-* तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोरअजंटी येथील ग्यानवी वारकरी शिक्षण संस्थेतील बालकिर्तनकार विद्यार्थ्यांना जळगाव येथील दिप मेडिकल महाबळ रोड यांचेकडून प्राथमिक उपचारांसाठी सर्वप्रकारच्या गोळ्याऔषधी व कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक साहित्य तसेच चोपडा येथील अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व श्री रामकृष्णहरी पंढरपूर वारकरी सेवा समितीतर्फे जीवनावश्यक किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले. ह्या निवासी संस्थेत जिल्ह्याभरातील चाळीस विद्यार्थी वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत असुन यातील जवळपास वीस विद्यार्थी बालकिर्तनकार आहेत. यासाठी संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.दिपक महाराज भागवताचार्य हे अथक परिश्रम घेत आहेत. ह्या संस्थेला शासकीय अनुदान नसुन ज्या दानशूर व्यक्तींना यथाशक्ती दानधर्म, रोख स्वरूपात देणगी किंवा वस्तूरूपी मदत करायची असेल त्यांनी ह.भ.प.दिपक महाराज यांच्या ८८३०२३३७९३ ह्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन चोपडा मार्केट कमिटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर गोरगावलेकर यांनी केले आहे.
संस्थेस वरीलप्रमाणे साहित्य वाटप प्रसंगी येथील पोलिस पाटील प्रविण सुलताने यांचेसह कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे पदाधिकारी जगन्नाथ बाविस्कर (चोपडा), अनिल कोळी, गोकुळ सुर्यवंशी, संजय बाविस्कर, दिपक कोळी, सुधाकर बाविस्कर, शिवाजी सुर्यवंशी, रतन बिराडे, अनिल सोनवणे (जळगाव), दिप मेडिकलचे संचालक दिलीप सपकाळे (फुफणी) यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी अभंग भजने भारूड गवळणी सादर केल्यात. शेवटी हरिपाठ होऊन ह.भ.प.दिपक महाराज यांनी सर्वांचे आभार मानले.

0 Comments