Advertisement


पुस्तक पिढ्यांचा वारसा जतन करतात: उर्मिलाताई भाटे.

 


चोपडा/ शिरपूर-- (प्रतिनिधी) -- पुस्तक पिढ्यान पिढ्या ज्ञान संग्रहाचे काम करतात पुस्तकांमुळे वारसा जतन केला जातो साहित्य क्षेत्रात ज्यांनी योगदान दिले आहे अशा व्यक्तींनी समाजात फार मोठी ज्ञान क्रांती केली आहे अशा शब्दात पंढरपूर येथील रुक्मिणी माता मंदिराच्या पुजारी श्रीमती उर्मिलाताई अविनाश भाटे यांनी येथे प्रतिपादन केले. शिरपूर तालुक्यातील निमझरी येथे विठ्ठल मंदिरात मंदिर समितीच्या विश्वस्तांनी श्रीमती भाटे यांना निमंत्रित केले होते. त्या अनुषंगाने त्यांनी येथे भेट दिली व कवी रमेश पाटील यांच्या सातव्या" ढुईका" काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. कवी पाटील यांनी शेतीमाती आणि सभोवताल घडलेल्या घटनांचा वास्तववादी लेखाजोखा पुस्तकात मांडला आहे याचा मला खूप आनंद आहे. या विठ्ठल मंदिराचे पवित्र राखण्यात राखण्यात छगन बापू सारख्या माणसांनी मंदिराच्या निर्मितीपासून ते आजवर घेतलेले परिश्रम त्याग, व भगवंता प्रति त्यांनी केलेले समर्पण कौतुकास्पद आहे. त्यांचे कार्य पाहून मी तर भारावून गेले आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले व आपण रुक्मिणी मातेची सेवा करतानाचे अनुभव त्यांनी ग्रामस्थां समोर विशद केले. यावेळी गोरख शंकर पाटील, निलाबाई पाटील, धनसिंग पाटील ,गयभु पाटील श्रीराम जगन्नाथ पाटील, ब्रिज लाल पाटील, सोमनाथ चौधरी गोकुळ पाटील व मान्यवर भाविकांची उपस्थिती होती. छगन बापू पाटील गजानन पाटील,

पंढरपूर येथील प्रतिभा भाटे, प्रज्ञा पुरोहित, प्रतिभाताई पाटील मच्छिंद्र गोरख पाटील,सौ.संजू बाई पाटील, सौ प्रतिभा छगन गुजर, अश्विन गुजर, योगराज पाटील अविनाश पाटील विक्रम पाटील व मान्यवर यावेळी उपस्थित होते आभार प्रदर्शन छगन बापू गुजर यांनी मानले.

Post a Comment

1 Comments

  1. आपले बातमी न्यूज ब्लॉग एकच नंबर

    ReplyDelete