चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील आडगाव येथे सत् खेडेकर वाड्यात कानबाई उत्सव व रोट साजरा करण्यात आले. यानिमित्त बाहेरगावाहून आलेले मुलं मुली तरुण विवाहित अविवाहित युवा वर्गाची मोठ्या प्रमाणावर हजेरी होती.
शनिवार दिनांक 15 ऑगस्ट पासून सोमवार दिनांक 17 पर्यंत कानबाई व रोट निमित्त घरोघरी आनंदात व उत्साहात पारिवारिक सोहळा संपन्न झाला. आडगाव येथे चार ते पाच ठिकाणी कानबाई उत्सव धामधुमीत पार पडला सव्वा प्रहराच्या कानबाईला सोमवार दिनांक 17 रोजी वाजत गाजत गावहाळवर निरोप देण्यात आला.
0 Comments