Advertisement


राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त डॉ. एस. आर. रंगनाथन यांना अभिवादन


दि. १२ ऑगस्ट २०२६महात्मा गांधी शिक्षण मंडळ, संचलित श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग & पॉलिटेक्निक), चोपडा येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ग्रंथालयाचे महत्त्व व मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी   प्राचार्य प्रा. व्ही. एन. बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रसंगी उपप्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. रंगनाथन यांच्या ग्रंथालय क्षेत्रातील अमूल्य योगदानाचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.“वाचाल तर वाचाल” या विचारातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, ज्ञानाची जिज्ञासा आणि ग्रंथालयाचा प्रभावी वापर वाढविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथालय विभागाने विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments