Advertisement


चोपडा आगारातर्फे नवरात्रोत्सवात "गाव ते नांदुरी गड" बससेवा


चोपडा( प्रतिनिधी)नवरात्रोत्सवात राज्यभरातुन  नांदुरी गडावरील देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असल्याने तसेच वाढती गर्दी लक्षात घेऊन व भाविकांची सोय व्हावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातर्फे गाव ते गड हि विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.११ आॉक्टोबर ते २६ आॉक्टोबर २०२६ या कालावधीत हि सुविधा आगाराकडुन उपलब्ध राहणार असुन ज्या गावातुन ४० भाविकांचा गट एकत्रित येवुन देवीच्या दर्शनासाठी जाणार असतील त्यांना गावापासुन ते थेट गडापर्यंत येण्या जाण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात येईल.भाविकांना दर्शनासाठी बस स्थानकावर येण्याची किंवा जाण्याची गरज भासणार नाही.तरी ज्या गावातुन ४० भाविकांनी एकत्रितपणे दर्शनाला जाण्याचे नियोजन केल्यास आगारातर्फे बसची व्यवस्था करण्यात येईल तसेच आगारातुन देखील जादा बसेस सोडण्यात येत आहेत. तरी भाविकांनी व प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख संदेश क्षीरसागर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments