चोपडा( प्रतिनिधी) शहराबाहेरील यावल रोडवरील समर्थ पॅलेस येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव 13 सप्टेंबर रोजी धुमधडाक्यात साजरा होणार आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन )चोपडा यांनी दिली. कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने तारीख 13 रोजी दुपारी तीन ते चार सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी चार ते पाच द्रव्य सोहळा, सायंकाळी पाच ते साडेपाच नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांनी मिळून अभिनंदन सोहळा, व रात्री आठ ते दहा वाजता महाप्रसाद भोजन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन इस्कॉन युथ चोपडा यांनी केले आहे.
0 Comments