चोपडा -: येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात चोपडा tv नगर परिषद आयोजित सेवा संकल्प अभियान अंतर्गत करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
चोपडा नगरपरिषदेने सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन चोपडा शहर व परिसरात केलेले आहे.
या अंतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
माजी पोलीस अधिकारी महाराष्ट्र पोलीस तथा माझी कायदा अधिकारी पोलीस आयुक्तालय ठाणे ॲड.अशोक शामराव चौधरी मुंबई,, चोपडा त्यांची जन्मभूमी असून तालुक्यातील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले.
आपल्या मार्गदर्शनपर सत्रात त्यांनी करिअरच्या विविध वाटा, आधुनिक तंत्रज्ञान व विविध क्षेत्र आणि विद्यार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. याचबरोबर सायबर सेक्युरिटी, डिजिटल अरेस्ट, सोशल मीडियाचा योग्य वापर, मोबाईलचा योग्य वापर, याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.
आणि चोपडा तालुक्यासाठी कधीही मार्गदर्शनासाठी उपलब्ध राहील असे आश्वासन उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दिले.
कार्यक्रमाची सुरुवात माँ सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक व्हि आर पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि सेवा संकल्प अभियान या संदर्भामध्ये माहिती दिली. याप्रसंगी नगरपरिषद चोपडा यांनी पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित केल्याबद्दल चोपडा नगरपरिषदेचे आभार मानले.
या करिअर मार्गदर्शन सत्राच्या आयोजनासाठी चोपडा नगर परिषदेच्या श्री. यजुश सोनार सर
सहाय्यक नगररचनाकार, श्री. महेश जोशी सर भांडारपाल, श्री. निलेश चौधरी सर, तांत्रिक सहायक, यांचे विशेष सहकार्य लाभले आणि श्री. राजु करंदीकर व श्री. अरुण शिंपी चोपडा नगर परिषद व विजय पाटील, किशोर पाटील, वेलसिंग आणि गजानन पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदलाल वाघ सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विजया पाटील मॅडम यांनी मानले.
याप्रसंगी इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.
[06/10, 10:18 pm] chotuwarde0: ,



0 Comments