Advertisement


सुंदर माझी शाळा’ उपक्रमात सत्रासेन आश्रमशाळा जिल्ह्यात प्रथम


 ‘सुंदर माझी शाळा’ उपक्रमात सत्रासेन आश्रमशाळा जिल्ह्यात प्रथम

सन्मानचिन्हासह एक लाखांचे पारितोषिक; शिक्षणमहर्षी संस्थापक अध्यक्षांचे शैक्षणिक स्वप्न साकार

सत्रासेन, ता. चोपडा : महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने सन २०२५-२६ मध्ये राबविण्यात आलेल्या ‘सुंदर माझी शाळा व वसतिगृह’ उपक्रमात धनाजी नाना चौधरी आदिवासी सेवा मंडळ, सत्रासेन संचलित धनाजी नाना प्राथमिक व डी.आर.बी. माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, सत्रासेन या शाळेने अनुदानित आश्रमशाळा गटातून जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.

या दैदिप्यमान कामगिरीबद्दल शाळेला सन्मानचिन्ह व रोख ₹१ लाखांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्यात उपआयुक्त श्री. हिवाळे, प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार, उपजिल्हाधिकारी श्री. श्रीमंत हरकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. प्रशांत माहुरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. संदीप पाटील व सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. प्रदीप दाभाडे, श्री पवन पाटील साहेब,सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती मिनाक्षी सुलताने मॅडम,यांच्या उपस्थितीत शाळेचा गौरव करण्यात आला.

शाळेची स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व आनंददायी शैक्षणिक वातावरण, शिस्तबद्ध नियोजन तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे हे यश मिळाले. शिक्षणमहर्षी संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आप्पासाहेब रायसिंग फुगा भादले यांनी पाहिलेले शैक्षणिक विकासाचे स्वप्न या यशातून साकार झाले असून, त्यांच्या शैक्षणिक विचारांना ही यशस्वी वाटचाल खरी आदरांजली ठरली आहे.

या उल्लेखनीय यशासाठी प्राथमिक मुख्याध्यापक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक, तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले. सर्वांच्या एकजुटीने, सातत्यपूर्ण मेहनतीने आणि समर्पित कार्यामुळे शाळेला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला.

संस्थेचे अध्यक्ष श्री. रविंद्र रायसिंग भादले, उपाध्यक्ष श्री. धनंजय रायसिंग भादले, सचिव श्री. ज्ञानेश्वर रायसिंग भादले, संचालक श्री. जितेंद्र रायसिंग भादले, संचालक श्री. नरेंद्र रायसिंग भादले, संचालक श्री. परमवीर रायसिंग भादले व संचालक श्री. चैतन्य भादले, तसेच सत्रासेन गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वंदना ज्ञानेश्वर भादले यांनी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

एकजूट, नियोजन, सातत्यपूर्ण परिश्रम आणि समर्पित कार्याला मिळालेली ही गौरवास्पद पावती असून, सत्रासेन आश्रमशाळेच्या शिरपेचात या यशामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Post a Comment

0 Comments