Advertisement


सेवा संकल्प अभियान अंतर्गत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाची इशिता महेश शिरसाठ तालुक्यात द्वितीय


संपूर्ण देशात *सेवा संकल्प अभियान* मोठ्या उत्साहात साजरा होत असताना  या अंतर्गत *चोपडा पंचायत समिती आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा* मोठ्या उत्साहात तालुक्यात संपन्न झाली या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यात 
*विवेकानंद विद्यालयाची इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी इशिता महेश शिरसाठ हिला या स्पर्धेत तालुक्यातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले* 


नियोजित कार्यक्रमात इशिताला ते पारितोषिक देण्यात येणार आहे 
*इशिताला विद्यालयाचे तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले*
 इशिताच्या या यशाबद्दल तिचे व कलाशिक्षकांचे अभिनंदन व कौतुक संस्थेच्या अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर , उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल ,सचिव ॲड. रवींद्र जैन , सहसचिव डॉ.विनीत हरताळकर , विश्वस्त नरेंद्र भावे ,डॉ.अमित हरताळकर, डॉ.नीता हरताळकर,गटशिक्षणाधिकारी साहेब अजित पाटील ,केंद्रप्रमुख दीपक पाटील ,स्पर्धा व्यवस्थापक प्रशांत सोनवणे , मुख्याध्यापिका सरला शिंदे ,पर्यवेक्षक पवन लाठी ,यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ सर्व विभाग प्रमुख शिक्षकवृंद, पालकवृंद यांनी *अभिनंदन व कौतुक केले* .

Post a Comment

0 Comments