वाढत जाणाऱ्या झाडांच्या कत्तलीमुळे तापमानात झालेली वाढ,तसेच असंतुलित हवामान याने मानवजातीची व निसर्गाची अपरिमित हानी होत असल्याने, पर्यावरण संतुलन कायम राखण्यासाठी *कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मियावाकी घनवन हा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे* या प्रकल्पांतर्गत महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे, दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाला "कबचौ" "उमवी" जळगाव यांच्याकडून *मियावाकी घनवन प्रकल्प अंतर्गत वृक्षरोपण करण्यास मान्यता देण्यात आली आहे*. सदर प्रकल्प आपल्या महाविद्यालयाला प्राप्त व्हावा यासाठी *वनश्री पुरस्कार प्राप्त संस्थेचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील व प्राचार्य प्रा.डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ. विशाल पांडुरंग हौसे प्रयत्नरत होते*. या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर महाविद्यालयातील ३६ एकरच्या परिसरातील नियोजित जमिनीमध्ये सपाटिकरण, जमिनीस रोटा मारणे, खड्डे खोदून ठेवणे इ. कामे राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयं सेवकांनी केलेले होते. रासेयो एकक कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांनी संकलित केलेल्या विविध जातीच्या ६५०० वृक्ष रोपांपैकी ३२०० रोपांचे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या हस्ते रोपण करण्यात आले. *या प्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील यांनी आवर्जून उपस्थित राहत, रासेयो विभाग व या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्यात* यावेळी प्राचार्या डॉ.संध्या एम.सोनवणे यांच्यासह उपप्राचार्य डॉ. के .एन. सोनवणे, उपप्राचार्य श्री.पी.एस.पाडवी समन्वयक डॉ. शैलेश वाघ,रजिस्ट्रार श्री.डी.एम पाटील उपस्थित होते. वृक्षरोपण कामी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सी.आर देवरे, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. दीनानाथ पाटील, श्री. संदीप भास्कर पाटील, डॉ.प्रविण महाजन प्रा. पी. आय. जैन, श्री.एस.टी.शिंदे,श्रीमती सुनिता पाटील,श्रीमती अनिता सांगोरे,श्री.विवेकानंद शिंदे,यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील कला व वाणिज्य विभागातील विद्यार्थी बंधू-भगिनींचे सहकार्य लाभले
0 Comments