Advertisement


जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त चोपड्यात 19 रोजी कार्यक्रम

 

चोपडा (प्रतिनिधी) 19 ऑगस्ट रोजी चोपडा शहरातील नारायणवाडी भागात असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघात सकाळी अकरा वाजता जागतिक फोटोग्राफी दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमास सर्व फोटोग्राफर बांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन छोटू उर्फ भगवान वार्डे यांनी केले आहे.

जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला यंदा प्रथमच पंकज समूहाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश पंडित बोरोले हे राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील, उपनगराध्यक्ष पंकज भैय्या बोरोले, तहसीलदार भाऊसाहेब थोरात,

डीवायएसपी सुनील पाटील, उद्योजक विश्वनाथ भाऊ अग्रवाल, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पी.आय. पवन देसले, गटविकास अधिकारी अंजली बर्गे, दिया गॅस एजन्सी चे संचालक नितीन आबा पाटील, यशोधन हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल पाटील, मारुती हॉस्पिटलचे डॉक्टर आनंद पाटील, कवी व साहित्यिक रमेश जे पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख, उपाध्यक्ष जिजाबराव नेरपगारे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून तालुक्यातील फोटोग्राफर बंधूंनी या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन छोटु उर्फ भगवान वार्डे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments