चोपडा( प्रतिनिधी) तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांसाठी पुन्हा पावसाची गरज निर्माण झाली असून तालुक्यातील अद्यापही काही भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे. खरीप हंगामातील मका, ज्वारी, बाजरी सोयाबीन आदि पिके, निसनीवर आली असून कोरडवाहू कापूस, मूग उडीद या पिकांनाही पावसाची गरज आहे. या हंगामात पावसाने तीन वेळा ओढ दिल्याने या खेपेला तर अत्यंत शेतकऱ्याचा जीव कासावीस झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेने यंदा फक्त निम्मा पाऊस झाला आहे. पावसाने यापुढे अजून ताण दिल्यास खरीप हंगामावर त्याचा दुष्परिणाम होणार आहे. श्रावणात ऊन पडते? हा एल निनो चा प्रभाव आहे असे हवामान खात्याचे निष्कर्ष आहेत.
0 Comments