Advertisement


जळगाव महानगरपालिका जळगांव प्रशासकीय इमारतीच्या प्रशस्त व भव्य प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

 जळगांव शहर महानगरपालिका जळगांव यांचे


विद्यमाने आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी 80 वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहाने 17 मजली महानगरपालिका जळगांव प्रशासकीय इमारतीच्या प्रशस्त व भव्य प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

    प्रारंभी राष्ट्रीय गीत वंदे मातरम म्हणण्यात आले.त्यानंतर  महापौर सौ.दीपमाला ताई मनोज काळे यांनी आपले शुभहस्ते ध्वजारोहण केले.त्यांचे सोबत आयुक्त मा.आदित्य जीवने साहेब उपस्थित होते.ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली. तद्नंतर राष्ट्रगीत जनगणमन व राज्य गीत म्हणण्यात आले.


     महापौर सौ दीपमाला ताई मनोज काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी हरिश्चंद्र सोनवणे सर यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत केले. 

   ध्वजारोहण कार्यक्रमास उपमहापौर मनोज चौधरी,स्थायी समिती सभापती डॉ चंद्रशेखर पाटील,अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर मॅडम, उपायुक्त निर्मला गायकवाड पेखळे मॅडम,मुख्य लेखापरीक्षक विजयकुमार सोनवणे,मुख्य लेखाधिकारी राजू लाकुडझोडे तसेच सर्व अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.नगर सेवक,नगरसेविका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments