रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०च्या वर्ष २०२५-२६ मधील
पुरस्कार सोहळ्यात चोपडा रोटरी क्लबचा गौरव
रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० अंतर्गत असलेल्या १२१ रोटरी क्लब्सच्या नुकत्याच नाशिक येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात चोपडा रोटरी क्लबने आपल्या वर्षभरातील जनोपयोगी व सेवाभावी कार्याची प्रभावी छाप उमटवत तब्बल ९ मानाचे पुरस्कार प्राप्त केले.रोटरी चोपडाचे प्रेसिडेंट रोटे. आशीष जैस्वाल, मानद सचिव रोटे. विश्वास दलाल, सहसचिव रोटे. संदीप सूर्यवंशी, कोषाध्यक्ष रोटे. निखिल सोनवणे तसेच सर्व रोटरी सदस्यांच्या सामूहिक प्रयत्नांची ही अभिनंदनीय पावती ठरली आहे.चोपडा रोटरीला प्राप्त झालेले पुरस्कार :१) बेस्ट क्लब प्रेसिडेंट२) कंझ्युमर अवेअरनेस अँड गाईडन्स३) दिल से दिल तक४) बेस्ट वर्क डन फॉर ट्रायबल५) बेस्ट फॅमिली वेल्फेअर६) बेस्ट RCC Activity७) बेस्ट नॉन-मेडिकल प्रोजेक्ट८) डिस्ट्रिक्ट सायटेशन९) बेस्ट पब्लिक रिलेशन १२१ क्लब्समधून विविध विभागांतील कार्याची घेतलेली ही पुरस्काररूपी दखल म्हणजे चोपडा रोटरीच्या वर्षभराच्या निरंतर सेवाकार्याला मिळालेली कौतुकाची आणि प्रेरणेची मोठी शाबासकीच आहे. चोपडा रोटरीचे सर्व सुविधांनी सुसज्ज सुंदर रोटरी भवन, गेल्या ६ वर्षांपासून सातत्याने आयोजित होत असलेला रोटरी उत्सव, हरताळकर हॉस्पिटलच्या सहकार्याने दोन मशिन्ससह सुरू असलेले डायलिसिस सेवा केंद्र, ३ ऑर्थोपेडिक लायब्ररी, ॲम्ब्युलन्स सेवा, अमरधाम विसावा तसेच शहर आणि ग्रामीण भागातील विविध शैक्षणिक, आरोग्यविषयक, सामाजिक व जनोपयोगी उपक्रम अशा अनेक सेवाकार्यातून चोपडा रोटरीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
‘सेवा हीच ओळख आणि समाजहित हेच ध्येय’ या भावनेतून कार्यरत असलेल्या चोपडा रोटरीच्या सेवा कार्याची ही ९ पुरस्कारांची दखल निश्चितच अभिमानास्पद आहे.
चोपडा रोटरी क्लबचे प्रेसिडेंट, पदाधिकारी व सर्व रोटरी सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
चोपडा रोटरीच्या सेवाकार्याची ही यशोगाथा अशीच विस्तारत जावो आणि ‘Service Above Self’चा विचार अधिकाधिक समाजापर्यंत पोहोचो, ही मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹अभिनंदन चोपडा रोटरी! सेवेचे कौतुक… पुरस्कारांना मानाचा मुजरा!💐

0 Comments