Advertisement


चोपडा येथे वर्षावास पुष्पमाला सहावे संपन्न


  भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व अंतर्गत  चोपडा तालुक्याच्या वतीने चोपडा येथे राष्ट्रीय वर्षावास प्रवचन मालिका पुष्पमाला ६वे (सहावे)आयु.शालिग्राम करंदीकर (प्रमुख, समता सैनिक दल)यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आयुनी. संगीता भरत शिरसाठ  यांनी केले. तसेच त्रिशरण,पंचशील ग्रहण करून *आजचा विषय - सिम्बॉल ऑफ नॉलेज -डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर प्रवचनकार आयु.भरत भिमराव शिरसाठ (शहराध्यक्ष,भा. बौ.म.बौद्धचर्या) यांनी मालिकेतले पुष्प पूर्ण करून धम्मदेसना दिली.* यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष समता सैनिक दल प्रमुख आयु.शालिग्राम व्यंकट करंदीकर, जानकीराम शंकर सपकाळे,संजय पिरा अहिरे, वसंत बाबुराव शिंदे, छोटुभाऊ वारडे ,अनिल गोरख वाडे,संजय साळुंखे सर, दीक्षा भरत शिरसाठ बौद्ध उपासक- उपाशिका भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आयु.संजय साळुंखे सर यांनी केले. शेवटी आभार अनिल गोरख वाडे यांनी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments