काजीपुरा गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे दारूबंदी केल्याने त्यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकी प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री रवींद्र दंगल पाटील माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती , ताईसो आशाताई रवींद्र पवार व्हाईस चेअरमन साखर कारखाना चहार्डी , श्री रमेश बाबा सोनवणे ग्रामपंचायत सदस्य ,श्री सूर्यकांत मधुकर पाटील सरपंच ,श्री संजय दंगल पाटील उपसरपंच श्री रोहिदास पाटील चेअरमन लक्ष्मी दूध डेरी काजीपुरा व सदस्य मंडळ यांनी दारूबंदीची दखल घेऊन जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन केले त्यात गावातील सतरा महिला बचत गटांनी दारूबंदी सक्रिय सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तुकाराम बाविस्कर माजी उपाध्यक्ष पं स चोपडा, प्रमुख पाहुणे श्री माजी शिक्षक आमदार तात्यासो श्री दिलीप शंकरराव सोनवणे व श्री पांडुरंग पाटील माजी सदस्य पं स चोपडा उपस्थित होते प्रास्ताविक श्री रमेश सोनवणे यांनी केले श्री तुकाराम बाविस्कर व श्री दिलीप सोनवणे यांनी गाव व्यसनमुक्त केल्याबद्दल सर्व महिला बचत गट सदस्यांचे कौतुक व अभिनंदन केले जि प प्राथमीक शाळा मुख्याध्यापक श्री प्रफुल पाटील व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जि प शाळा काजीपुरा उपशिक्षक श्री दीपक माधवराव पाटील यांनी केलेत
0 Comments