जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने...आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध!
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समिती, जळगाव जिल्हा यांच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत.
📅 दिनांक : २७ ऑगस्ट २०२६, गुरुवार
⏰ वेळ : सकाळी ११.०० वाजता
📍 स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जळगाव
आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, सामाजिक न्यायाच्या भूमिकेला बळ देण्यासाठी आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात लोकशाही मार्गाने बुलंद आवाज उठवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व समाजबांधव, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच आरक्षण समर्थक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
*हक्कासाठी लढा! सामाजिक न्यायासाठी संघर्ष!*
*हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा!...निदर्शने यशस्वी करा*
आवाहन :
आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समिती, जळगाव जिल्हा
0 Comments