Advertisement


ग.स. सोसायटीच्या ध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागाला! तालुका आरोग्य सहाय्यक विजय देशमुख यांच्या शुभहस्ते उत्साहात ध्वजारोहण


चोपडा(प्रतिनिधी) भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आशियातील एकमेव सर्वात मोठी पतसंस्था म्हणून लौकिक प्राप्त असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स. सोसायटी), चोपडा शाखेच्या विद्याविहार येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे ग.स. सोसायटीच्या चोपडा शाखेतील ध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी तथा आरोग्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी विजय देशमुख यांच्या शुभ हस्ते सकाळी 8.45 वा.करण्यात आला.

विजय देशमुख हे तालुका आरोग्य सहाय्यक-तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,चोपडा तसेच माजी जिल्हाध्यक्ष-जि.प.आरोग्य कर्मचारी संघटना, जळगाव संचालक-धन्वंतरी जि.प.तांत्रिक आरोग्य कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्था मर्या.जळगाव असे विविध पद भूषवले असून ध्वजारोहणापूर्वी देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला पुष्प अर्पण करून, नारळ फोडून विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. संपूर्ण परिसरात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

या प्रसंगी ग.स. सोसायटीचे ज्येष्ठ मा. संचालक रमेश शिंदे, माध्यमिक पतपेढी जळगावचे मा.अध्यक्ष रत्नाकर बाविस्कर, ग.स. सोसायटीचे मा. अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सुनिल सुर्यवंशी,योगेश सनेर,ग.स. सोसायटी जळगाव कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष मंगेश भोईटे  माजी तज्ञ संचालक एकनाथ पाटील,राजेश पाटील सर, केंद्रप्रमुख डॉ.भिकन शिरसाठ, जळगाव हिवताप कर्मचारी पतसंस्था चे जगदीश बाविस्कर,आरोग्य सहाय्यक सुनील महाजन, सुनील भालेराव, आरोग्य सेवक पुष्पजीत सोनवणे, जि.प. आरोग्य कर्मचारी संघटना जळगाव तालुका अध्यक्ष संदीप शिंदे, नितीन चौधरी, अनिल माळी, अशोक वारे, मडावी रामलू, दिनकर वाघ, विनोद पवार, डॉ. महेंद्र पाटील, एन.डी. पाटील, तालुका आशा समन्वयक सागर शिंपी, लसीकरण अधिकारी दिलवर वडवी, सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक आंबू कुमावत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कुणाल शिंदे, राजुभाऊ पवार, आरोग्य सहाय्यिका शोभा चौधरी तसेच ग.स सोसायटी चोपडा विभागिय अधिकारी दिलीप सपकाळे शाखाधिकारी शरद पाटील,चेतन सोनवणे,स्मिता मोरे शितल मोरे,यासह सोसायटी चे अधिकारी कर्मचारी, मोठ्या संख्येने आरोग्य सेवा कर्मचारी व आरोग्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाच्या या राष्ट्रीय पर्वानिमित्त ग.स. सोसायटीच्या चोपडा शाखेने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा ध्वजारोहणाचा मान देऊन केलेला सन्मान हा आरोग्य विभागाच्या कार्याची पावतीच असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. जनतेच्या आरोग्यसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळालेला हा सन्मान निश्चितच अभिमानास्पद असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग.स.सोसायटी चोपडा शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे शाखाधिकारी-प्रवीण सत्येसा. यांनी केले, तर आभार मंगेश भोईटे यांनी मानले .

आरोग्य विभागाचा गौरव, ग.स. सोसायटीचा सन्मान आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना—या त्रिवेणी संगमाने चोपडा ग.स. सोसायटीचा स्वातंत्र्य दिन सोहळा अविस्मरणीय ठरला.

Post a Comment

0 Comments