Advertisement


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार चोपडा तालुका व शहर कार्यकारिणीची घोषणा; 43 पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान चोपडा, दि. 6 सप्टेंबर 2026 :


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या चोपडा तालुका व शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. रविवार, दि. 6 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता जनसेवा हॉस्पिटल, चोपडा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमात चोपडा तालुका, शहर तसेच विविध सेल व आघाड्यांच्या एकूण 43 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते तथा आदिवासी सेलचे कार्याध्यक्ष मा. डॉ. चंद्रकांत जामसिंग बारेला,जळगाव जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री. प्रमोद बापू पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ. विजया ताई पाटील महिला जिल्हाध्यक्ष सौ. कल्पिता पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश पगारे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री. मजहर पठाण, यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


या नियुक्त्यांमधून तालुका व शहर पातळीवर पक्षाची संघटनात्मक रचना अधिक व्यापक करण्यासोबतच युवक, महिला, विद्यार्थी, आदिवासी, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक, ओबीसी, किसान, भटके-विमुक्त व अपंग सेल यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

नवनियुक्त पदाधिकारी

तालुकाध्यक्ष – दिनेश नारायणराव बाविस्कर

चोपडा विधानसभा अध्यक्ष – सचिन मच्छिंद्र डाभे (वर्डी)

तालुका कार्याध्यक्ष – सतीश अशोक पाटील (दोंदवाडे)

शहर अध्यक्ष – समाधान भागवत पाटील (चोपडा)

चोपडा युवक विधानसभा अध्यक्ष – दीपक रविंद्र पाटील (मितावली)

महिला तालुका अध्यक्ष – अलका पहाडू कोळी (वैजापूर)

तालुका उपाध्यक्ष – ईश्वर भावजी सूर्यवंशी (वाळकी)

तालुका उपाध्यक्ष – अशोक किसन पाटील (बोरखेडा)

युवक सरचिटणीस – महेंद्र नथ्थू पाटील (घोडगाव)

सरचिटणीस – अधिकराव उत्तम धनगर

सहसरचिटणीस – अश्विन रविंद्र पाटील (कुरवेल)

चिटणीस – नितीन लीलाचंद पाटील (घोडगाव)

कार्यालयीन चिटणीस – सचिन हिलाल पाटील (चुंचाळे)


महिला उपाध्यक्ष – जरीना अकिल देशमुख (लासूर)

महिला कार्याध्यक्ष – ललिताताई भरत बाविस्कर (चोपडा)

महिला तालुका उपाध्यक्ष – सबनूर सिकंदर तडवी

विद्यार्थी तालुका अध्यक्ष – ऋषिकेश अर्जुन बाविस्कर

युवक तालुका अध्यक्ष – योगेश राजेंद्र चौधरी (निमगव्हाण)

युवक तालुका उपाध्यक्ष – भूषण अरुण पाटील (लासूर)

युवक तालुका उपाध्यक्ष – विकास ईश्वर निकम (माचला)

मीडिया शहराध्यक्ष – सुनील विष्णू पाटील (चोपडा)

आदिवासी सेल तालुका अध्यक्ष – सखाराम सोनवणे (घुमावल)

सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष – प्रमोद सुनील शिरसाठ (हातेड)

सामाजिक न्याय विभाग युवक तालुका अध्यक्ष – नरेश विक्रम नगराळे (गोरगावले)

सामाजिक न्याय विभाग युवक उपाध्यक्ष – प्रविण अशोक निकम (गोरगावले)

अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष – अश्रफ खान दिलावर खान शिकलकर (चोपडा)

अल्पसंख्यांक युवक तालुका अध्यक्ष – मुराद अली इरफान अली सय्यद

अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष – निसार अली मंजूर अली सय्यद

युवक शहराध्यक्ष – अल्केश गोकुळ महाजन (चोपडा)

युवक उपशहराध्यक्ष – शकील अहेमद अब्दुल सत्तार (चोपडा)

ओबीसी सेल तालुका अध्यक्ष – समाधान हिरामण माळी (विष्णापूर)

ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष – उत्तमराव संतोष मोरे (घोडगाव)

अपंग सेल तालुका अध्यक्ष – अतुल पाटील

किसान सेल तालुका अध्यक्ष – धनराज गंगाराम पाटील (चुंचाळे)

भटके-विमुक्त सेल तालुका अध्यक्ष – खेमचंद धनराज धनगर (कमळगाव)

कार्यकारिणी सदस्य – शेख युनुस शेख याकुब (चोपडा)

जिल्हा सरचिटणीस – नंदाताई रामा बारेला

जिल्हा उपाध्यक्ष, आदिवासी – हेमंत तुकाराम भिल (विरवाडे)

जिल्हा सामाजिक न्याय उपाध्यक्ष – विठ्ठलराव उत्तम साळुंखे (अडावद)

जिल्हा सरचिटणीस, आदिवासी सेल – नंदलाल मघा भिल

जिल्हा उपाध्यक्ष – रविंद्र काशिनाथ पाटील (गणपूर)

तालुका सरचिटणीस – दिलावर पिंजारी (वडती)

तालुका मीडिया अध्यक्ष – सोहन मनोज पाटील (दोंदवाडे)

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाची संघटनात्मक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

चोपडा तालुका व शहरातील विविध स्तरांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा मिळणार असून आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

प्रमुख उपस्थिती

मा. श्री. प्रमोद बापू पाटील – जळगाव जिल्हाध्यक्ष

सौ. कल्पिता पाटील – महिला जिल्हाध्यक्ष

श्री. सुरेश पगारे – सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष

श्री. मजहर पठाण – अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष

सौ. विजया ताई पाटील – महिला प्रदेश उपाध्यक्ष

मा. डॉ. चंद्रकांत जामसिंग बारेला – महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता तथा कार्याध्यक्ष, आदिवासी सेल, महाराष्ट्र प्रदेश

स्थळ : जनसेवा हॉस्पिटल, चोपडा

दिनांक : 6 सप्टेंबर 2026

वेळ : दुपारी 2.00 वाजता

Post a Comment

0 Comments