Advertisement


महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलीत ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम सी बी एस ई स्कूल, चोपडा येथे विद्यार्थी परिषदेच्या प्रतिनिधींचा शपथ ग्रहण सोहळा..


कवयित्री उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न*..

महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलीत ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम सी बी एस ई स्कूल, चोपडा  येथे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील तसेच सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी सदस्यांचा शपथ ग्रहण सोहळा कवयित्री उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष अॕड. श्री. संदीप सुरेश पाटील, प्रमुख पाहुणे  डॉ. के.बी. पाटील शाळेचे समन्वयक डॉ. डी एस .पाटील प्राचार्य अरुण पाटील  तसेच उपप्राचार्या अश्विनी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
 या प्रसंगी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. त्यासाठी त्यांना शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू यांचे मार्गदर्शन लाभले. मुलांचा प्रमुख विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून शाश्वत गायकवाड   आणि मुलींची प्रमुख विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून पलक बाहेती  तसेच उपविद्यार्थी प्रतिनिधी म्हणून  खरांशू सोनवणे व उपविद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून कुशल देवरे  यांनी शपथ ग्रहण केली. 
विविध विभागातील विद्यार्थी प्रतिनिधींनी देखील शपथ ग्रहण केली. यात खेळ विभाग प्रमुख म्हणून कुलदीप साळुंखे  व कलश  क्षीरसागर ,तसेच उपखेळ विभाग प्रमुख म्हणून अथर्व वार्डे  व खुशी पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून यश धनगर व स्वरा पाटकर ,उपसांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून स्वामी देशमुख व गंगोत्री साळी ,शिस्त विभाग प्रमुख म्हणून जय पाटील व  समृद्धी जैसवाल, उपशिस्त विभाग प्रमुख म्हणून तेजस राठोड व शर्वरी पाटील, रेड हाऊस  प्रमुख सार्थक कदम व अक्षदा पाटील,  यलो हाऊस प्रमुख वीर सोनवणे व रिद्धी पाटील, ग्रीन हाऊस  प्रमुख पियुष सपकाळे व चेतना पाटील, ब्लू हाऊस प्रमुख रोहन पाटील व वैभवी बाविस्कर यांनी देखील शपथ ग्रहण केली. 
याप्रसंगी  शाळेचे मुख्याध्यापक श्री.अरुण पाटील  यांनी प्रास्तविक करत विद्यार्थ्यांना पदग्रहणाची शपथ दिली. डॉ. के बी पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थांना नेता व नेतृत्व यातील फरक समजावून सांगितला. वाचनाने मनुष्य खऱ्या अर्थाने समृध्द होतो हे पटवून दिले. त्यांनी विविध उदाहरणे देऊन लहान काम देखील परिणामकारक ठरू शकते हे विविध घटनांद्वारे स्पष्ट केले. उत्तम नागरिक होण्यासाठी शिस्त आवश्यक आहे हे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष अॕड.श्री. संदीप सुरेश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना  नेतृत्व किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. पदग्रहण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना उत्तम काम करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्यांनी डॉ. के. बी. पाटील यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील काही आठवणी सांगत त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील अश्विनी ढबू व कपिल पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन विशाल मराठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments