मार्गदर्शक डॉ. चंद्रकांत राभाजी देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण
चोपडा (विशेष बातमीदार):
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील महाविद्यालय चोपडा येथील पदव्युत्तर वाणिज्य व संशोधन केंद्र चे संशोधन विद्यार्थी शुभम शिवाजी सोनार (Sonar Shubham Shivaji) यांना विद्यापीठाद्वारे १९ ऑगस्ट २०२६ रोजी 'डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी' (Ph.D.) ही पदवी जाहीर करण्यात आली आहे.
शुभम सोनार यांनी आपला डॉक्टरेटचा संशोधन प्रबंध "Incubation Center in Higher Education Institutions and its role in Entrepreneurship Development" (उच्च शिक्षण संस्थांमधील इन्क्युबेशन सेंटर आणि उद्योजकता विकासातील त्याची भूमिका) या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक विषयावर पूर्ण केला आहे. हे संशोधन वाणिज्य व व्यवस्थापन (Commerce & Management) या विद्याशाखेअंतर्गत करण्यात आले आहे.
सदर संशोधन कार्य महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉक्टर सुरेश जी पाटील महाविद्यालयातील मार्गदर्शक डॉ. चंद्रकांत रभाजी देवरे (Dr. Chandrakant Prabhaji Deware) यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. सोनार यांनी आपले मार्गदर्शक डॉ. चंद्रकांत देवरे, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य मा. ॲड .संदीप सुरेश पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. संध्या एम. सोनवणे , उपप्राचार्य, समन्वयक व सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

0 Comments